नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत शहिदांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा

164

 

नांदेड /प्रतिनिधी आनंद गोडबोले

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड येथे 26 आकरा 2008 मध्ये शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. व भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून, संविधान दिन साजरा करण्यात आला.

- Advertisement -

        यावेळी महापालिकेच्या महापौर श्री जयश्री निलेश पावडे यांनी प्रथमतः सकाळी अकरा वाजता 26 आकरामध्ये शहीद झालेल्या जवानांना, सामूहिक रित्या एक मिनिट मौन धारण करून, श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर हुंडाबंदी दिनानिमित्त, हुंडाबंदी विषयीची सामूहिक शपथ महापौर श्री जयश्री निलेश पावडे यांनी सर्वांना दिली. आणि त्यानंतर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. आणि हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी नांदेड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसरामाळा येथील, प्रशिक्षण हॉलमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात, मा. आयुक्त श्री डॉक्टर सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंग संधू, उपायुक्त शुभम क्यामतवार, जनसंपर्क अधिकारी श्रध्दा बबन उदावंत , मुख्य लेखा परिक्षक टि. एल. भिसे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्यासह कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.