कृष्णरच्या किर्ती गोल्ड कंपनीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संबधित चार विभागाच्या अधिकाऱ्यांना नायगावच्या तहसीलदारा मार्फत निवेदन .

कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ----- सोनालीताई हंबर्डे यांचा इशारा

200

 

नायगांव / प्रतिनिधी( रामप्रसाद चन्नावार )

नायगांव तालुक्यातील कृष्णूर येथील अद्योगिक वसाहतीत निर्मिती करण्यात आलेली किर्ती गोल्ड कंपनी ही गेल्या अनेक वर्षा पासून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करून मोठया प्रमाणात लूट करत असल्यामुळे व नायगांव तालुक्यातील वृक्षाची कंपनीने चांगलीच वाट लावली असल्यामुळे या सदरच्या कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी या मागणीसाठी सोनालीताई पाटील हंबर्डे भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष व अंकुशकुमार देगावकर यांनी नायागांवच्या तहसीलदारा मार्फत चार विभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन दिले आहे

- Advertisement -

तालुक्यातील कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी गेल्या अनेक वर्षापासून नायगाव तालुक्यातील कीर्ती गोल्ड ही कंपनी ही एका धनदांडग्या भांडवलदाराची असल्यामुळे
वनविभागाचे अधिकारी कंपनी जाऊन पाहणी केल्याचा बनवट कांगावा केला व आर्थिक तडजोडीत कंपनीत लाकूडच सापडले नसल्याचा देखावा करून वनपाल ग्रुपवार यांनी उडवा उडावीचे उत्तर देऊन कीर्ती गोल्ड कंपनीला पाठीशी घालण्याचे काम वन विभागाचे अधिकारी करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत असल्यामुळे सदरच्या वनविभागा अधिकाऱ्यासह कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी असी मागणी सोनालीताई हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी केली असून कार्यावाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे

             कृष्णूरची कीर्ती गोल्ड कंपनी ही राज्यात एक नंबर वर चालते व कीर्ती गोल्ड कंपनी नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातुन हजारो टन सोयाबीन खरेदी करत असते परंतु कुंटूर मार्केट कमिटीच्या ही डोळ्यात धूळ टाकून कमी सोयाबीन खरेदी करत असल्याचे सांगत टॅक्स कमी भरते आणि शासनाची जीएसटी मोठ्या प्रमाणात बुडवत असल्याचे सदरच्या निवेदनात नमूद करण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांच्या संगनमताने सदरची वृक्षा तोड होत असून व कीर्ती गोल्ड कंपनी खरीदी करत असताना ही वनविभागाचे अधिकारी सांगतात कंपनीत एक लाकूड दिसले नाही म्हणून डोळ्यावर पैशाची पट्टी बांधून जनतेची दिशाभूल वनविभागाचे अधिकारी करत आहेत.

ग्रामीण भागासह तालुक्यातील वृक्षाची होत असलेली तोड लाकूडाची मोठ्या प्रमाणात होत असून खरेदी करून नायगाव तालुक्याचे वाळवंट बनले असल्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा धोका व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले वन विभागाचे अधिकारी कीर्ती गोल्ड कंपनीत साठवण करून ठेवलेल्या लाकडांचा पंचनामा करून कंपनीवर कार्यावाही करण्या ऐवजी अधिकाऱ्यानी मलिदा घेऊन मालोमाल झाले असल्याचे जनतेसह तक्रार कर्त्यांचे म्हणे असून त्याच बरोबर कीर्ती गोल्ड कंपनीतून दररोज भेसळ युक्त खाद्य तेल विक्री होत असल्यामुळे भेसळ अधिकारी नांदेड यांच्यामार्फत ही चौकशी करून कारवाई करण्यात यावी असी मागणी निवेदना द्वारे केली आहे

कंपनीने गहाण पाणी कांही वर्षाखाली सोडळल्यामुळे त्या दुर्गंधी गहाण पाण्यामुळे शेतकऱ्याचे जनावरे ही मरण पावले होते त्या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची आर्थिक मदत कंपनी कडून करण्यात आली नाही ते गहाण पाणी कायमचे बंद करण्यात यावे कीर्ती गोल्ड कंपनीने हवेत सोडणारा धुरामुळे प्रदूषण वाढत असल्यामुळे प्रदूषण अधिकाऱ्यांनी चौकशी करून कंपनीवर कारवाई करावी अन्यथा किती गोड समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सोनालीताई व अंकुशकुमार यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला असून कांही अनुचित प्रकार घडल्यास स्वता प्रशासन जबादार असेल यांची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावे असे निवेदनात सांगितले असून त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.