शिष्यवृती परीक्षेमध्ये ब्लू बेल्सने राखली गुणवत्तेची कमान 

145

 

नायगांव / प्रतिनिधी( रामप्रसाद चन्नावार )

नायगाव येेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेथील ब्लू   बेल्स इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे यांच्या वतीने 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृती परीक्षेमध्ये नायगांव तालूक्यात पुन्हा एकदा गुणवतेची कमान उंचावली आहे. पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा इयता 5 वी मध्ये एकूण 32 विद्यार्थानी यश संपादन केले. त्यापैकी स्नेहा देविदास जमदाडे या मुलीने 91% गुण घेऊन सर्वप्रथम आली,सोहम निलेश कोटगीरे 75% गुण द्वितीय आली तर विराज नागनाथ मोरलवार यांने 68% गुण घेऊन तृतीय आला आहे. तसेच पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी मध्ये शाळेचे एकूण 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून स्नेहा रामराव वनशेट्टे हिने 64% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावली, सयाली साईनाथ पाटील हिने 63% गुण घेऊन द्वितीय आली तर श्रीनिवास सतीष मेडेवार यानेे 58% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. गेल्या 10 वर्षापासून नायगांव तालूक्यामध्ये ब्लू बेल्स या इंग्रजी माध्यम शाळेने सर्वच प्रकारच्या परीक्षेमध्ये आपली गुणवत्ता कायम राखत उंच भरारी घेतली आहे विशेष म्हणजे सदरील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करून घेण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे शाळा चालू नव्हत्या तरीदेखील संबंधीत विषयाच्या शिक्षकांनी ऑनलाइन क्लास घेऊन विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन करून गुणवत्तेमध्ये कमी पडू दिले नाही याशिवाय संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.के. हरीबाबू आणि शाळेच्या मुख्याद्यापिका सौ. लक्ष्मी हरीबाबू यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. याकामी पुर्व उच्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मारोती पांढरे, श्रीनिवास संगणवार,दत्ता कंदुर्के, राहुल वाघमारे, संभाजी गायकवाड, प्रतिमा इंगळे आणि शिवाजी डाकोरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली तर पुर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा इयता 8 वी साठी दत्ता सुर्यवंशी, अंकुश मोरे, सुधाकर वडजे, दिगंबर गदले, शिवाजी फिरंगे,मिना शिरोळे आणि शेख आवेज या शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यामुळेच लॉकडाऊन काळातही ब्लू बेल्सने गुणवतेच्या यशाची कमान राखली आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.के. हरीबाबू, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी हरीबाबू, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृध्द यांनी सर्व विद्यार्थ्याचे व विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.