जिल्हावार्तानांदेड

पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा.


 

 

नायगाव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आ. किशोर पाटील यांच्या समर्थक गुंडानी भ्याड हल्ला करून मारहाण केली या घटनेचा निषेध करून संबंधित हल्लेखोराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार विजय येरावाड यांच्या माध्यमातून याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.

   पाचोऱ्यातील पत्रकार संदिप महाजन यांनी परखडपणे व सत्य बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरुन आ.किशोर पाटील यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर,त्यांच्या समर्थकांनी काही दिवसातच त्यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला केला याबाबत महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या तब्बल ११ संघटनांनी सविस्तर माहितीसह निवेदन दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला परंतू,संबंधित दोषींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामूळे या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगानेच दि .14 आगस्ट रोजी नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायगांव तहसील कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करून सविस्तर निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, लक्ष्मणराव भवरे,प्रभाकर लखपत्रेवार,गजानन चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार मनोहर तेलंग,रघुनाथ सोनकांबळे,

जिल्हा संघटक पंडित वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार,तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे,तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार, बापूराव बडूरे,डिजीटल मिडीया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शेळगांवकर, तालुकाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,रामराव पाटील ढगे,मनोहर मोरे,लक्ष्मण बरगे,कुंटूर सर्कलप्रमूख अनिल कांबळे, नरसी शहराध्यक्ष गोविंद नरसीकर,बालाजी हनमंते, शेषेराव कंधारे,प्रकाश महिपाळे,भगवान शेवाळे,किरण वाघमारे,शेख अजीम,साहेबराव धसाडे,शेषेराव बेलकर, अंकुश देगांवकर,शिवाजी कुंटुरकर.आनंद डाकोरे, शिवाजी पांचाळ तळणीकर.प्रशांत वाघमारे . परमेश्वर जाधव.आदींची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »