होटाळा गावात पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होऊनही काम सुरू करण्यासाठी गुत्तेदारांना मुहूर्त सापडेना ? खा.चिखलीकरांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा योजनेचा मोठा गाजावाजा करून केला होता शुभारंभ.
नरसीफाटा/ शेषेराव कंधारे
होटाळा ता.नायगाव येथे हर घर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून भाजपच्या माजी जिल्हा अध्यक्ष सह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले खरे परंतु त्या कामाची अद्याप सुरुवात करण्यासाठी संबंधित गुत्तेदारांना मुहूर्त सापडत नसल्याने शासनाने घालून दिलेल्या वेळात काम पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असून माजी शिक्षण सभापती होटाळकरांच्या गावातच पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले असल्याने बाकीच्या गावांचा प्रश्न कधी सोडणार अशी चर्चा नायगाव तालुक्यात सुरू आहे. हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून देशातील खेड्यापाड्या शहरासह प्रत्येक व्यक्ती पाणी टंचाईच्या काळात वंचित राहू नये म्हणून या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी देण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून जल जीवन मिशनच्या माध्यमातून नायगाव तालुक्यातील योजनेत असलेल्या जवळपास संपूर्ण गावांतील पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूरही झाला आहे. नागरिकांना आती आवश्यक असलेल्या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. खेड्यातील
नागरिकांना पिण्याच्या पाण्याची दरवर्षी मोठी टंचाई भासत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असे परंतु आता कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. कारण सरकारकडून त्यांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असुन तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून अनेक गावांमध्ये पाईप लाईन टाकण्याचे काम चालू आहे तर काही गावांमध्ये विहीरीचे बांधकाम पुर्ण झाले आहे परंतु होटाळा गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम अद्यापही सुरुवात करण्यासाठी संबंधित गुत्तेदारांना मुहूर्त सापडत नसल्याने होटाळा गावातील नागरिकांना हर घर पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळणार की गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडली जाणार अशी चर्चा नागरीकांतुन होत असुन तात्काळ योजना सुरू करण्यात यावी असेही मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.
होटाळा नगरीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत परिश्रम घेत असुन नुकतेच काही दिवसांपूर्वी नायगाव तालुक्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीकोनातून पीएम किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तहसील प्रशासनाला निवेदन देऊन जागे केले आहे असे अनेक समाजोपयोगी प्रश्न मार्गी लावत आहेत त्यामुळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या चाहत्यांकडुन भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर पोस्ट ही टाकल्या जात असताना स्वताच्या गावातील नागरिकांना अति आवश्यक असलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणीपुरवठा योजना आहे. हि योजना मंजूरही झाली आहे. त्या योजनेचा सहा महिन्यांपूर्वी हनुमान मंदीरा समोर मोठे मंडप टाकून मोठा गाजावाजा करून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शुभारंभ ही करण्यात आले. परंतु पाणी पुरवठा योजनेला अद्याप सुरूवातही करण्यात आलेली नाही त्यामुळे गावातील नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार की गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडली जाणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकराच्याच गावात पाणी पुरवठा योजनेचे काम सहा महिन्यांपासून रखडला असल्यामुळे तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहा सहा महिने लागत आहेत त्यामुळे तालुक्यातील गावातील नागरिकांचा प्रश्न कधी मार्गी लावणार अशीही चर्चा तालुक्यात सुरू आहे.