नायगाव नगरपंचायतचे कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर…

108

नायगाव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार

महाराष्ट्र राज्यात सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यास राज्य सरकारसोबत वारंवार बैठका घेऊनही या सरकारने अद्यापही ह्यावर कोणताही तोडगा काढलेला नसल्याने महाराष्ट्र राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यासाठी नायगाव शहरातील नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च 2023 पासून नगरपंचायत प्रांगणात बसून बेमुदत संप सुरू केला आहे…

राज्यातील सर्वच नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची हाक महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे, जिल्हा सचिव जितेंद्र ठेवरे, मराठवाडा अध्यक्ष मारोती गायकवाड, प्रदेश संघटक सतिश देशमुख, वैजनाथ स्वामी, यांनी देताच नायगाव येथील नगर पंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर बापुले
यांच्या नेतृत्वाखाली 14 मार्च 2023 पासून शहरातील नगरपंचायत प्रांगणात राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे.

- Advertisement -

ह्या संपावर कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव,श्रीधर कोलमवार,संभाजी भालेराव,गोपाळ नाईक,रमेश चव्हाण,शेख मौला,गणेश चव्हाण,मुन्ना मंगरूळे.अजय सुर्यवंशी.धनराज वरणे.बालाजी बोईनवाड.साहेबराव चिंचोले.खुशाल सालेगाये.श्रीराम बेळगे.बालाजी चव्हाण.मारोती गायकवाड.दिलीप वाघमारे.उमेश कांबळे.साईनाथ बेळगे. लालबा भेंडेकर.यांच्यासह नायगाव नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.