जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शंकरनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने कर्तबगार महिलांचा सन्मान.
नरसीफाटा/ शेषेराव कंधारे
शंकरनगर ता. बिलोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर येथील कर्तबगार महिलांचा येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान जेष्ठ पत्रकार डॉ.निवृती भागवत व डॉ. दयानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर ता.बिलोली येथील कर्तबगार महिला डॉ.सौ.छाया एम.धुप्पेकर, डॉ. सुनिता गिरी या दोन्ही महिला सामान्य जनतेचे आरोग्य हे निरोगी राहावे यासाठी वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यात पोलिस आमालदार या पदावर सक्रिय कार्य करणाऱ्या स्वामी मॅडम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ.निवृत्ती भागवत, डॉ दयानंद माने, मनोहर मोरे, शेषेराव कंधारे, हणमंतराव वाडेकर, ज्ञानेश्वर तोडे, पोलिस उपनिरीक्षक आर.बी.राठोड, भवानगीरकर, कुलकर्णी, बोडके आदिसहसह अनेक जण उपस्थिती होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून नारीशक्तीला बळ देण्याचे कार्य केले. आजही ग्रामीण भागात महिलांचे अधिकार महिलेला न देता पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा जोपासला जातो त्यामुळे महिलेची उचंबना होताना दिसून येते त्यामुळे महिलेना महिलेचे अधिकार बजावण्याची संधी दिली पाहिजे असे मत प्रा.डाॅ.निवृती भागवत यांनी व्यक्त केले.