नायगांव अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी निलेश देशपांडे तर सचिवपदी साईनाथ पा.कवळे यांचा दणदणीत विजय..

98

 

 

 

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क…

दिवाणी व फौजदारी‎ न्यायालय नायगाव च्या वकील संघाच्या‎ अध्यक्षपदी ॲड‎.निलेश देशपांडे तर‎ सचिवपदी ॲड‎.साईनाथ पाटील कवळे सोमठाणकर हे बहुमताने विजयी‎ झाले असून नायगाव वकील संघाच्या‎ सन २०२३ साठी पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या‎ निवडणुकीत जेष्ठ विधींतज्ञ ॲड.नारायणराव लंगडापुरे यांच्या पॅनलचे अध्यक्ष पदासाठी ॲड.‎ निलेश देशपांडे व साईनाथ कवळे हे बहुमताने विजयी झाले आहे.

- Advertisement -

            नायगाव अभिवक्ता महासंघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठी झालेल्या‎ निवडणुकीत ॲड. निलेश देशपांडे यांना‎ १४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी‎ ॲड. बी.एम.वाघमारे यांना ९ मते‎ मिळाली.तर ॲड. निलेश देशपांडे यांचा ५‎ मतांनी दणदणीत विजय झाला.‎ सचिव पदासाठी ॲड.साईनाथ पाटील कवळे यांना १५ मते तर प्रतिस्पर्धी ॲड.एस.बी.कुलकर्णी यांना ८ मते पडली.‎तर ॲड. साईनाथ पा.कवळे यांचा ७ मतांनी दणदणीत विजय झाला असून ॲड.बी.एम.वाघमारे व ॲड.एस.बी.कुलकर्णी यांचा या निवडणुकीत दारून पराभव झाला.

 

निवडणूक निकालानंतर सर्व‎ वकिलांनी विजयी जल्लोष साजरा‎ केला. या निवडणुकीसाठी निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधितज्ञ ॲड. के.आर.पाटील सुजलेगावंकर यांनी‎ काम पाहिले तर. या निवडणुकीत ॲड.एस.बी.कदम सोमठाणकर यांचे‎ मोलाचे सहकार्य लाभले.‎

या विजयी जल्लोषाप्रसंगी ॲड‎.के.आर.पाटील , ॲड‎.एन.एस.लंगडापुरे , ॲड‎.यु.जी. मेगदे ,ॲड‎.यु.जी.कांगठीकर , ॲड‎.यु.बी.बिलोलीकर, ॲड‎.एस.बी. इंगोले, ॲड‎.सौ.एस.जी.कोकणे ,ॲड‎.एस.एन.जाधव , ॲड‎.एल.एस.तुमेदवार , ॲड‎.एस.बी.कदम सोमठाणकर ,ॲड‎.ए.एम.निलंगेकर ,ॲड‎.बी.बी. जाधव , ॲड‎.सी.एम. वजीरगांवकर ,ॲड.जी.पी. कवळे ,ॲड.आर.एल.एकलारे ,ॲड‎.के.जी.शिनगारे बिजुरकर , ॲड‎.जे.आय.जावेद , ॲड‎.एस.एन.मांजरमकर ,ॲड‎.एस.एस. गोपछडे , ॲड‎.डी.एम.कुलकर्णी आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष ,सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.