सालेगाव येथील आत्महत्याग्रस्त शिवशांत राचोटकर यांच्या घरी नाभिक शिष्ट मंडळाची सांत्वनपर भेट.

647

 

कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हणमंते

 

नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील सालेगाव येथील “आत्महत्याग्रस्त शिवशांत पंडित राचोटकर” रा.सालेगाव ता. नायगाव जि नांदेड येथील रहिवासी, वय 34 वर्ष व्यवसाय शेती या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला कंटाळून 27 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता घरातील तुळई ला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.या प्रकरणी नांदेड शिष्टमंडळाचे प्रतीनीधी राचोटकर परीवरास सांत्वना पर भेट दिली.

- Advertisement -

घरातील कर्ता पुरुष गेल्यावर राचोटकर परीवरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कैलास वाशी शिवशांत राचोटकर यांच्या पश्चात आई ,पत्नी दोन मुलं, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.परीवाराचे पालन पोषण अशी जवाबदारी त्यांच्या पत्नी वर पडलेली आहे. पिडीत परीवारशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून नाभिक समाज सदैव तुमच्या पाठीशी राहील असा धिराचा आधार दिला व आम्ही सर्व तुमच्या दुःखात सहभागी आहेत असे ही शिष्टमंडळाने सांगितले.

परीवाराने खचून न जाता ठामपणे उभे राहून हीमतीने कामाला लागले पाहिजे.असे ही सांगितले. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नाभिक शिष्ट मंडळ सदैव तुमची मदत करेल असेही सांगितले.या प्रसंगी नाभिक एकता महासंघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ. उज्वला ताई बालाजीराव गुरसुडकर, ” अखिल भारतीय जिवा सेना ” संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. राजीव राचोटकर सालेगांवकर , नाभिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नागनाथ माधापुरे साहेब, कार्याध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ली, प्रसिद्ध प्रमुख पत्रकार दत्ता चापुलकर व युवा कार्यकर्ते कपिल गुरसुडकर व इतर नाभिक समाज बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.