सततच्या नापिकीमुळे सालेगाव येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या.

540

 

 

 

कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हणमंते

निसर्गाच्या लहीपणामुळे आणि सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना आता कोणी वाली नसल्यामुळे युवा शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. हि चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

अश्याच निसर्गाच्या लहीपणामुळे एका युवा शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील मौजे सालेगाव येथील अतिवृष्टीमुळे व सततच्या नापिकीमुळे पीक गेल्यामुळे कंटाळून सालेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना  दि २७ आँक्टोबर रोज गुरुवारी दुपारी 4 वाजता घडली.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शिवशांत पंडित राचोटकर वय  (35)  वर्षे आहे.

घटनेची माहिती सालेगाव येथील उपसरपंच राजु पाटील जाधव
यांनी पाेलिसांना  दिली. कुंटूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे सर पो का इश्ववरे यांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . शिवशांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.