संविधान आणि लोकशाहीचे रक्षण हा भारत जोडो यात्रेचा उद्देश – मा. अशोकराव चव्हाण

218

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे 

 

देशात जाती-धर्म आदीच्या नावावर समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे देशातील कायदा, सुव्यवस्था ढासळत असून लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील बंधुभाव, एकते बरोबरच संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे आवश्यक आहे. या उद्देशांची पूर्तता करण्यासाठीच भारत जोडो यात्रेचा आरंभ झाला आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. ते शंकरनगर येथे भारत जोडो यात्रेच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना बोलत होते.

- Advertisement -

      राष्ट्रीय काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे दि.७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील देगलूर येथे आगमन होणार आहे. दि.८ नोव्हेंबर रोजी शंकरनगर येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे.

या यात्रेतील सहभागी यात्रेकरूंचे स्वागत, निवास, आरोग्य, भोजन व्यवस्था यासह यात्रा मार्गावर विविध कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन या संदर्भात शंकरनगर येथील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या प्रारंभी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नांदेड जिल्हा महिला काँग्रेस आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या मान्यवरांच्या निवासासाठी नियोजित तीन शिबिरे, आरोग्य व्यवस्था, भोजन व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, रोषणाई, यात्रा मार्गावरील कॉर्नर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रेत सहभागी होणारे बिलोली तालुक्यातील संभाव्य पदाधिकारी, नागरिक यांची संख्या आदी संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली. माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड तालुक्यातून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची संभाव्य संख्या, त्या संदर्भातील नियोजनाची सविस्तर माहिती या आढावा बैठकीत दिली. आढावा बैठकीला संबोधित करताना

मा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, मा. राहुलजी गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचे आपल्या भागातील आगमन ही ऐतिहासिक घटना आहे. सुदैवाने आपण सर्वजण या घटनेचे साक्षीदार आहोत या खा.राहुजी गांधी यांच्या देगलूर येथील स्वागतासाठी व नांदेड येथे दि.१० नोव्हेंबर रोजी आयोजित जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.

या आढावा बैठकी प्रसंगी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ.अमर राजूरकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, आ. जितेश अंतापुरकर, सुरेंद्र घोडजकर, ओमप्रकाश पोकर्णा, मधूमती संकलोड, बाळासाहेब पाटील खतगावकर, संभाजी पा. भिलवंडे, संजय आप्पा बेळगे, संजय पाटील शेळगावकर, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, कविताताई कळसकर, डॉ. मीनाक्षीताई कागडे, केदार पाटील साळुंखे, दिलीप पा. बेटमोगरेकर, भाऊसाहेब पा. मंडलापूरकर, सुभाष पा. दापकेकर, गंगाधर सोंडारे, सरजीत सिंग गिल, प्रताप पा. जिगळेकर, माधवराव कंधारे ,जयवंतराव गायकवाड, श्रीनिवास पाटील, गणेश पाटील, हजप्पा पाटील, विठ्ठल माने, ज्ञानेश्वर संगनाळे, बाळासाहेब चट्टे, प्राचार्य बालाजी पिंपळे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय, प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक धोंडिबा वडजे यांच्यासह बिलोली, मुखेड, नायगाव तालुक्यातील पदाधिकारी, आजी- माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाघमारे यांनी केले तर आभार आनंदराव बिरादार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.