अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार.
नायगाव प्रतिनिधी: हणमंत चंदनकर
नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव (छत्री) येथील एका युवकाचा दुचाकीवरून देगलूरकडे जात असताना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून सदर वाहनांचा पोलीस तपास करीत आहेत.
मौजे शेळगाव (छत्री) येथील युवक व्यंकटी गणपती निलावार वय (३५) वर्ष हे दुचाकीवरून वैयक्तिक कामानिमित्त देगलूरकडे जात असताना नरसी येथील चढतीवर दुपारी २ ते ३ च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने जोरात धडक मारल्याने मोठा अपघात झाला या अपघातात व्यंकटी निलावार यांचा जामीच मृत्यू झाला आहे.
त्यांना शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी रामतिर्थ पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे करीत आहे.