जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालयीन कामानिमित्य येणाऱ्या मुख्याध्यापकांना स्वतंत्र बैठक व्यवस्था करणार –  दिग्रसकर

399

 

नायगांव प्रतिनिधी -हानमंत चंदनकर

दि.14/10/2022 वार शुक्रवार रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींचे हायस्कूल नरसी ता.नायगाव येथे नायगाव मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजीत सहविचार सभा व नूतन मराठवाडा / जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी व नूतन जिल्हा शिक्षण मंडळ संचालक यांच्या सत्कार समारंभासाठी मा. श्री दिग्रसकर साहेब शिक्षणाधिकारी (मा) , मा. श्री सलगर साहेब उपशिक्षणाधिकारी (मा) , मा. श्री बनसोडे साहेब उपशिक्षणाधिकारी (मा) हे उपस्थित झाले असता इतर शैक्षणिक प्रश्ना सोबत नांदेड जिल्ह्यातील कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षण विभाग जि.प. नांदेड येथे स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याची मागणी अध्यक्ष या नात्याने करण्यात आली त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मा. श्री दिग्रसकर साहेब यांनी येत्या काही दिवसात कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षण विभागात स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल असे सांगीतले त्याबद्ल जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने साहेबांचे मनस्वी आभार
या बैठकीसाठी नायगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री कदम साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. सुरेश पाटिल साहेब, मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक मा. श्री चंद्रशेखर पाटिल, मा. श्री दिलीपराव धर्माधिकारी, राज्य सदस्य मा. श्री शंकरराव डक, नुतन राज्य स्थायी सदस्य मा. श्री मोतीभाऊ केंद्रे, विभागीय सदस्य मा. श्री चंदलवाड व्हि.आर, मा. सौ विजया लोंढे, जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव मा .श्री अशोक मोरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव मा. श्री मोहनराव फाजगे, प्रवक्ते मा.श्री विठ्ठल चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख मा.श्री जिवन शिंदे, मा.श्री जे जी केंद्रे , शिक्षण मंडळाचे नुतन संचालक मा.श्री बि.डी. कदम, मा.श्री एस.डी.देशमुख, मा.श्री त्र्यंबक चव्हाण, मा.श्री मनोहर पाटिल, मा.श्री विलास शिंदे, मा.श्री जिंकले, मा.श्री संग्राम शिंदे, मा.श्री वसंत दिग्रसकर, मा.श्री फुलसिंग राठोड, मा.श्री सर्जेराव जाधव, मा.सौ अनिता गोपछडे , मा.सौ सुचित्रा भगत तसेच मा.श्री हवगीराव गोपछडे, मा.श्री चिंतलवार, मा.श्री यशवंत गजभारे, मा.श्री पांढरे, मा.श्री हिवराळे, मा.श्री तुकाराम पाटिल, मा.श्री अशोक सुगावकर, प्रा. श्रीकांत जाधव, मा.श्री केरबाराव फाजगे , सौ.पाटिल, सौ. सोंडारे, सौ.विभूते, सौ.पवार, नायगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक तसेच बैठकीचे सुत्रसंचलन नायगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.श्री व्यंकटराव नकाते यांनी केले. तर बैठकीचे आयोजन राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता गोपछडे यांनी केले

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.