गणपती बाप्पाला आनंदमय वातावरणात निरोप.

नऊ दिवसांच्या श्रीच्या मुर्तिचे शातंतेत विसर्जन.

679

 

नायगांव : शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यातील धुप्पा बसवेश्र्वर नगर येथील बाल गणेशाचे दि.८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात व डिजेमुक्त वातावरनांत रिमझिम पावसात निरोप देण्यात आला.

- Advertisement -

नायगाव तालुक्यातील धुप्पा बसवेश्र्वर नगर येथील बाल गणेश मंडळाच्या वतीने श्री.गणेशाची महाअर्ती करुन येथील भक्ताना महाप्रसादाचे वाटप करुन मार्गस्थ झाले व गणेशाचे विसर्जन अत्येत शांततेत झाले असुन या विसर्जनात हिन्दु – मुस्लीम सर्व समाजबांधवांनी एकत्र येउन गणेशाच्या विसर्जनात अनंदात सामिल झाले होते . गणेशाच्या विसर्जेनात तरुन पिढी देखील कुठलाही अनुचित प्रकार घडुने म्हनुन प्रतेकांनी वयक्तीक जबाबदारी घेतली होती.

गणेश उत्सव अतिशय शांततेत पार पडण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संकेत दिघे व सहकारियांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

विशेष म्हणजे डिजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करून ढोल ताशाच्या गजरात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

गणरायाला निरोप देताना महिला पुरुष तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.