कंधार तालुक्यातील शिराढोणचे भूमिपुत्र जवान राजेश्वर भुरे कर्तव्य बजावताना शहीद.

उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार…

826

 

 

नायगांव तालुका प्रतिनिधि अंकुशकुमार देगावकर

 

:दि.5.जिल्यातील कंधार तालुक्या मधील शिराढोण येथील  राजेश्वर आनंदराव भुरे  या लष्करी जवानाला कर्तव्य बजावत असताना सिंकद्राबाद येथे वीरमरण आले असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक 6 सप्टेंबर रोजी शिराढोण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

- Advertisement -

हैद्राबाद मधील सिकंद्राबाद या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना 4 सप्टेंबर रोजी वीर जवान राजेश्वर भुरे यांना वीर मरण आले आहे.शिराढोण येथील रहिवासी राजेश्वर आनंदराव भुरे हे गेल्या 13-14 वर्षा पासून इएमई बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते.

 

शहीद जवान राजेश्वर भुरे यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी, एक मुलगा 2 मोठे भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर 6 सप्टेंबर रोजी शिराढोण येथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.