गुटखाबंदिला नायगावात हरताळ, अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे होते  सर्रास विक्री.

435

 

 

नायगाव तालुका प्रतिनिधी अंकुशकुमार देगावकर

 

महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी सर्वत्र खुल्ले आम पणाने गुटका विक्री  नायगाव शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहे .

- Advertisement -

कर्करोगासारख्या घातक रोगाचे मूळ असलेल्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने केला जात असताना महाराष्ट्रात गुटखा तसेच पान मसाल्याचे उत्पादन वितरण साठा विक्री करण्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार 2006 नुसार बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यास अ जमीन पात्र गुन्हा नोंदवला जातो .

नायगाव शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केल्या जाते व संबंधित नायगाव तालुक्यामध्ये सहा ते सात मोठे गुटखा व्यवसाय करणारे व्यापारी असून नायगाव शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जाते नायगाव शहरांमध्ये गुटख्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून पोलीस प्रशासन मात्र यावर दुर्लक्ष करताना दिसत आहे .

पोलिस उप अधीक्षक अर्चित चांडक व्यक्तिशा लक्ष घालून यावर कारवाई करतील का असा  सवाल  जनतेतून  विचारला जात आहे.

नायगाव शहरात गुटखा विक्रीवर कोणाचे ही नियंत्रण नाही असे निदर्शनास येत असून या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविल्या गुटखा विक्री बंदीची सरास पायमल्ली होत असताना नायगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे नायगाव पो.ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे वैयक्तिक लक्ष घालून गुटखा बंदी नियम हाताशी घेऊन कारवाई करतील का,?

नायगाव शहरात दुकानावर तसेच नायगाव शहरात 25 ते 30 पान टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केल्या जात आहे यावर संबंधित अधिकारी चौकशी करून कारवाई करतील का याकडे मात्र नायगाव शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.