ग्रामपंचायत कार्यालय देगाव येथे 15 ऑगस्ट रोजी शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

744

 

नायगाव तालुका प्रतिनिधि अंकुशकुमार देगावकर 

 

15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो तसेच 75 वा अमृत महोत्सव दिनानिमित्त हर घर तिरंगा असा उपक्रम महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

नायगांव तालुक्या सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजविल्यामुळे चारही बाजूणे पाणीच पणीच झाले होते व काही ठिकाणी तर पावसाचे प्रमाण जास्ती चे झाल्यामुळे नदी ,नाले ,ओहळ,भरून वाहत होते कही गावाचा तर दोन दोन तीन तीन दिवस मुसळधार पाऊसामुळे  संपर्क तुटला होता तर काही गावात   घरात पाणी शिरले होते.

देगाव, पळसगांव, ताकबीड, टाकळगाव नायगाव तालुक्यातील ह्या चारही गावचा संपर्क तुटला होता प्रचंड अशी पुर परस्थिती झाली होती देगाव येथील शेतकरी व्यंकटराव मोरे हे पुरामध्ये अडकले असता त्यानी एका झाडाचा सहारा घेतला असता, गावकऱ्यानी एकत्र येऊन काही व्यक्तीने पुढाकार घेउन त्या शेतकऱ्याचे प्राण वाचविले.

संकट प्रसंगी आपला जिव धोक्यात टाकून ज्या व्यक्तीचे प्राण वाचवले त्या शुर विर अशा व्यक्तींचा   ग्रामपंचायत कार्यालय देगाव येथे शौर्य पुरस्कार वितरण सोहळा 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती देगाव चे सरपंच डॉक्टर दत्ता मोरे यांनी कळवली आहे .

सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून  नायगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार माननीय गजानन शिंदे व कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात आले आहे तरी परिसरातील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे ग्रामपंचायत कार्यालय देगाव मार्फत कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.