कुष्णूर  पाझर तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाझर तलावाचा बांध फुटण्याच्या मार्गावर..

293

 

नायगाव तालुका प्रतिनिधि अंकुशकुमार देगांवकर

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील पाझर तलावाचे काम निकृष्ट व अर्धवट झाल्यामुळे कृष्णूर येथील पाझर तलाव फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे गावकऱ्या मध्ये भिती चे वातावरण पसरले आहे.तलावाच्या पाण्या लगत 100 हेक्टर शेती असून सदरील तलाव फुटला तर संपूर्ण गावात पाणी शिरेल व कृष्णर हे गाव जलमय होऊन  घराघरात पाणी शिरेल अशी चिंता गावकरी व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

 गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाझर तलावाचे  काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरील काम हे 41 लाख 48हजार रुपयांचे असून शिवशंकर एंटरप्राइजेस या गुत्तेदाराने हे काम केले.

हलगर्जीपणामुळे वेळीच कामाची पाहणी व व्यवस्था न झाल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरेल व सर्वत्र पाणीच पाणी होईल अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे, संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस करण्यात आली पण अधिकारी फोन उचलत नाहीत त्यामूळ गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

 जलसंधारण विभागाचे इंजिनियर , गुत्तेदार तहसीलदार कामाची पाहणी करून निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी करून काय  कार्यवाही करतील याकडे तमाम कृष्णर येथील जनतेचे लक्ष लागून  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.