शंकरनगर महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ.

सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आव्हानाला समोर जा - डॉ.अजय टेंगसे.

262

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे

 

महाविद्यालयात पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील शिक्षण घेत असताना विविध कौशल्य आत्मसात करा.सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आव्हानाला समोर गेलात तर यश नक्की मिळते असे अधिष्ठाता डॉ.अजय टेंनसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

- Advertisement -

शंकरनगर ता.बिलोली येथील वरिष्ठ महाविद्यालयात चौथ्या पदवी वितरन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ( नॅक पुनर्मूल्यांकन’ब॑ दर्जा प्राप्त) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन दि.५ आॅगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ३५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते “पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आला.

          या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ.मिनल पाटील खतगावकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे,सिनेट सदस्य डॉ.डी.एन.मोरे, पिंपल्स काॅलेजचे लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.बालाजीराव वडवळे, प्राचार्य बालाजी पिंपळे,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.रविद्र जाधव, नायगाव मार्केट समितीचे उपसभापती मोहनराव पा धुप्पेकर, माजी चेअरमन सदाशिव पा डाकोरे, हणमंतराव तोडे,माधवराव कंधारे, संतोष पुय्यड, विठ्ठल माने, मुख्याध्यापक धनंजय शेळके, माधवराव वाघमारे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आरंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व कै.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले . अध्यक्षीय समारोप करताना डॉ.मिनल पाटील खतगावकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी पदवी मिळविल्यानंतर पुढील शिक्षण घेत असताना कठोर परिश्रम करून आपले ध्येय गाठावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

पुढे बोलताना डॉ.अजय टेंगसे म्हणाले की आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा. समाजाला माझं काहीतरी देणं लागते याची जाणीव विद्यार्थ्यांना ठेवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्राचार्य डॉ. बालाजी पिंपळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना रोजगार कशा पद्धतीने देता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्याचं बरोबर होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार असून येथील विद्यार्थ्यांचा चांगल्याप्रकारे ज्ञान देऊ शकतो यासाठी संस्थेचे पर्यत्न सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंदराव पांचाळ यांनी केले तर डॉ.पवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या पदववितर समारंभास परीक्षा विभाग प्रमुख प्रा.रविद्र जाधव,रा से.यो.विभाग प्रमुख प्रा. शिवाजी कांबळे, विद्यार्थी विकास प्रमुख डॉ.संभाजी कबाडी, संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शंकर लेखने, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.बालाजी जाधव, महाविद्यालय विकास समिती प्रा.गोविंदराव पांचाळ सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.