नायगाव शहरात अमृत महोत्सवानिमीत्य ” हर घर झेंडा उपक्रम”

193

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे 

 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर झेंडा उपक्रम प्रत्येक नागरीकांने आपापल्या घरावर झेंडा लावून हा उपक्रम नायगाव शहरात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी नायगाव नगर पंचायतच्या अधीकाऱ्यांनी कमी दरात तिरंगा ध्वज वितरण करण्याचे काम सुरू केला आहे.

- Advertisement -

नायगाव नगर पंचायतीने २६०० तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले असून शहरात हर घर तिरंगा वितरण करण्याच्या कामास सुरुवात झाली असून शहरवासीयांनी तिरंगा ध्वज शंभर टक्के उभारण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यधिकारी नंदकिशोर भोसीकर यांनी केले आहे.

नायगाव शहरात जवळपास २६०० कुटुंब प्रमुख आहेत आणि प्रत्येक घरांवर तिरंगा उभारणीसाठी माजी आ.वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने २६०० झेंडे नायगाव नगर पंचायतला उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नायगाव नगर पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक प्रभागात विशेष टिमची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक टिमच्य कर्मचाऱ्यांनी आपल्या वार्ड क्रमांक मधील प्रत्येक घरी नागरिकांनी हर घर तिरगा लावण्यात यावा यासाठी दि. १३ ते १५ ऑगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. हर घर तिरंगा उपक्रमाचे जनजागरण सोशल मीडिया व्दारे करण्यात आले असून नायगाव शहरात हर घर तिरंगा उपक्रमास नागरिकांनी स्वताहून प्रत्येकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारणी करतील अशी अपेक्षा नायगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांनी केले आहे.

हर घर तिरंगा वितरणास सुरुवात करताना नायगाव नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक सताराम जाधव, लिपिक बापुले, लिपिक मुन्ना मगरुळे, लिपिक कोलमवार, ग्रंथपाल श्रीकांत वडगावकर आदींची कर्मचारी उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.