श्री भास्करराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल मध्ये कै. डॉ. शंकरराव चव्हाण जयंती साजरीी.

301

 

 

नरसीफाटा/शेषेराव कंधारे

 

शंकरनगर ता. बिलोली येथील गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्री.भास्कराव बापुराव पाटील खतगावकर पब्लिक येथील कै.मधुकराव पाटील खतगावकर सभागृहात दि.१४ जुलै रोजी देशाचे माजी केंद्रीयगृहमंत्री व मराठवाडयाचे भाग्यविधाते कै. डाॅ.शंकरराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

           या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रामतीर्थ च्या सरपंच सौ. मनिषा राजेंद्र तोडे, उपसरपंच सौ.जयश्री मुरलीधर देगलुरे सह आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला . 

यावेळी स्वाती दोमाटे, वाघमारे खंडू ,शिनगारे ईश्वर,गणेश येरडे ,शेरे पुष्पा, सय्यद एल .बी. ,जाधव श्यामसुंदर,मुंसाडे नामदेव, झळके यादव,रामकिशन जाधव,बालाजी वाघमारे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.