नाल्यात पडून मृत्यू पावलेल्या  पिंपळगाव येथील व्यक्तींच्या कुंटुबीयांना तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते चार लक्ष रुपयांची शासकीय मदत.

713

 

 

नायगाव  – शेषेराव कंधारे

पिपंळगाव ता.नायगाव येथील लक्ष्मण पिराजी गुडांळे यांनी शौचालयासाठी नाल्यांच्या कडेला गेले असता त्यांचा पाय घसरून मृत्यू झाला होता.त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते शासकीय मदत म्हणून चार लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.

- Advertisement -

दि.१० जुलै रोजी सायंकाळी लक्ष्मण पिराजी गुडांळे हा पिंपळगाव लगत असलेल्या नाल्यांकडे शौचालयासाठी गेले परंतु तो खूप वेळ झाले घरी परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी सरपंच किरण कदम व लक्ष्मण चे नातेवाईक गावातील युवकांनी त्या रात्री व दुस-यां दिवशी नाल्यात लोखंडी गळ व काठ्याचे फरोळ टाकुन शोध घेतला असता दुपारी लक्ष्मण गुडांळे यांचे प्रेत नायगाव पुला जवळ सापडले होते.

            पुराच्या पाण्यात वाहुन जाऊन मुत्यृ पावल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कंटूबाला शासनाकडून अर्थिक मदत म्हणून चार लक्ष रूपये देण्यात येतात.

सदरील रक्कमेचा धनादेश नायगांव चे तहसीलदार श्री शिंदे साहेब यांच्या हस्ते पिडीत कुटुंबाला देण्यात आला.

त्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय मदत मिळावी यासाठी येथील सरपंच तथा सरपंच संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष किरण कदम यांनी तहसीलकडे सतत पाठपुरावा केला असता दि.१५ जुलै रोजी सायंकाळी पावनेचार वाजता नायगाव चे तहसीलदार गंजानन शिदे यांनी मयत लक्ष्मण पिराजी गुडांळे यांच्या पत्नी ललिता लक्ष्मण गुंडाळे घरी जाऊन चार लक्ष रूपयांचा धनादेश  स्वरुपात आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.

यावेळी तलाटी बालाजी राठोड, पिंपळगावचे सरपंच किरण कदम, उपसरपंच शेख रशीद, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ इंगोले,सायबु त्यापनवाड, ज्ञानेश्वर माने,भगवान माने, सुभाष पातगे, अशेक वाघमारे आदी जण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.