नरसीत कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.

1,411

 

 

 

नायगांव प्रतिनिधी-शेषेराव कंधारे

भरधाव कंटेनर ने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नायगाव तालुक्यातील नरसी येथे घडली असून आयचर कंटेनर चालकाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisement -

पोलीस सुञाकडुन मिळालेल्या माहितीनुसार मालवाहतूक आयचर कंटेनर क्र.आर.जे.०२ .जी.बी. ०१०७ हा कंटेनर दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने देगलुर हून नरसी शहरात येत असताना नरसी -देगलुर रोडवर असलेल्या चामुंडा हाॅटेल येथे चहा फराळ करून बाहेर रोडच्या कडेला उभा असलेल्या भुमा गणपती गायकवाड वय ५० वर्ष रा.बेळकोणी बु.ता.बिलोली यास जोराची धडक दिल्याने इसमाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत असलेल्या ईसमास नायगाव च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले आस्था येथील डाॅक्टरनी जखमी भुमा गणपती गायकवाड यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले .

यात कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व निष्काळजी पणामुळे मजुरांला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मयत भुमा गणपती गायकवाड यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून बेळकोणी ता.बिलोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्यात कंटेनर क्र.आर.जे.०२.जी.बी.०१०७ च्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला
असून पुढील तपास सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख लतिफ हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.