नरसीत नवविवाहितेची सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल.
नायगाव प्रतिनिधी – शेषेराव कंधारे
नरसी येथील विवाहित महिलेनी सासरी होणारा शारीरिक व मानसिक छळास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नरसी येथे घडली. नरसी येथील सासरच्या चार जणांविरुद्ध रामतिर्थ पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की धनवाडी ता. पालम येथील गायत्री डोगरे हिचा विवाह नरसी येथील ऋषीकेश सुवर्णकार यांच्या सोबत सहा महीण्यापूर्वी झाला होता.लग्ना नंतर गायत्री सासरी नांदायला आल्या नंतर गायत्री व ऋषीकेश यांचा संसार चांगला सुरू होता परंतु गायत्री व ऋषीकेश यांचा प्रेम विवाह झाला असल्याने घरात कुरबुर सुरू होती. महिन्यांनंतर सुवर्णकार कुटुंबातील पत्ती, सासु नंनद नंदवाई यांनी मिळून गायत्रीला माहेरहुन गाडी घेण्यासाठी दिड लाख रूपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सासंरच्या सततच्या जाचांला कंटाळून गायत्रीने दि.१२ जुलै रोजी सायंकाळी पाच च्या दरम्यान खोलीत गळफास लावून आत्महत्या केली .
सदरील घटना गायत्रीच्या माहेरच्या नातेवाईकांना कळविण्यात आली . मयत गायत्रीची आई पुजा गुणाजी डोगरे वय ४५ रा.धनेवाडी ता .पालम यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रामतिर्थ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त व छळ केल्याने गायत्रीचा पती ऋषीकेश रमेश सुवर्णकार , सासु जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका करूना माधव आगदीवे ऊर्फ सुवर्णकार , ननंद रागीनी मयुर पंडीत , नंदवाई मयुर पंडीत यांच्या विरूध्द कलम ४९८, ३०४ ब ,३०६ , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे नुतन साहयक पोलिस निरीक्षक व्हि.एस.पल्लेवाड हे करीत आहेत.
घटनास्थळी बिलोलीचे पोलीस उपाधिक्षक अर्चित चाडंक यांनी भेट देऊन चौकशी केली आहे…..