गोगलगाय, पैसा व हरणाच्या कळपाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान.

कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज.

349

 

 

नायगाव प्रतिनिधी – शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन,तूर, मुग, उडीद, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून अनेक ठिकाणी गोगलगाईने सोयाबीन व उडीद या कोवळ्या पिकाची पाने कुरतडून नुकसान करत आहेत
तर दुसरीकडे हरणाच्या कळपाने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गोल पैसा व गोगलगाईच्या यासंदर्भात कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला ज्या भागात पाऊस झाले त्या भागात थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर मागील आठवड्यापासून चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सर्वत्र पेरणी केली परंतु काही ठिकाणी बोगस बियाण्याच्या बॅगा व्यापा-यांनी शेतकरयांना विक्री केली त्यामुळे अनेक ठिकाणी बियाण्याची उगवनच झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुबारा तिबारा सोयाबीनची पेरणी करावी लागलेली असताना शेतकरी त्याचं संकटातून बाहेर निघाले नाही तर आता सोयाबीन व उडीद पिकांवर पैसा व गोगलगाईने कोवळ्या पानांची कात्रण करून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.

तर दुसरीकडे नायगाव तालुक्यातील असंख्य गावासह धुप्पा,कुंचेली, शेळगाव गौरी,भोपाळा,टाकळी,कुंचेली, धानोरा, कांडाळा सह माळरानावर असलेल्या शेतात हरणाच्या कळपाने सोयाबीनचे पीकांचे नुकसान करत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून काही शेतकरी तर चक्क पिकावर नांगर फिरवून दुसऱ्यांदा पेरणी करण्याच्या तयारीत आहेत.

यासंदर्भात कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यावर हे संकट कोसळले आहे. खरे पाहता कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसह पिकांची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन व माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र नायगाव येथील कृषी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक गावांचा अतिरिक्त कामाचा भार एकाच कर्मचाऱ्यांवर येत असल्याने ते कृषी सहायक अनेक गावांत भेटी देऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसह पिकांची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन मिळाले नाही.

प्रत्येक गावात कृषी अधिकारी जाऊन शेतकरयांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.