अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची अर्थिक मदत करा : जनशक्ती संघटनेची मागणी

304

 

नांदेड एक्स्प्रेस वृत्तसेवा

मागील तीन  दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून. कोवळ्या पिकासह शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे. तर नदी काठच्या हजारो हेक्टर शेतीत दगड गोटेच शिल्लक राहिले आहेत. निसर्गाच्या अवकृेमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाखाची अर्थिक मदत करावी अशी मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

जनशक्ती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष उमाकांत पाटील तिडके व मराठवाडा संपर्क प्रमुख प्रभाकर लखपत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

अगोदरच एक महिना पावसाने डोळे फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. कुठे अंशतः व कुठे तत्वतः पावसाच्या सरी पडल्याने शेतकऱ्यांनी पुढे पाऊस पडेल या भरवशावर पेरण्या केल्या. त्यामुळे पेरण्या केलेल्यांच्या शेतात हिरवळ निर्माण झाली होती. शेतात कोवळी रोपे दिसू लागली असतांनाच मागच्या तीन दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले व ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन कोवळ्या पिकासह खरडून गेली. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. विशेषतः नदी काठच्या जमीनीत फक्त दगड गोठेच दिसत आहेत.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून. दोनदा पेरणी करुन कंबरडे मोडलेले असतांनाच तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी अर्थिक संकटात सापडले आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देवून त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी अर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाले व ओढ्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची अर्थिक मदत द्यावी अशी मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी बाळू पाटील शिरफुले (जिल्हाध्यक्ष उत्तर), कोंडीबा पाटील ढगे( नांदेड शहराध्यक्ष), रजणी मेडपल्लेवार ( परभणी व हिंगोली संपर्क प्रमुख ), सौ. विद्या वाघमारे ( महिला जिल्हाध्यक्ष, उतर ) सौ. सोनालीताई पाटील, जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) गणेश जाधव, बळीराम पाटील टेकाळे व दशरथ राठोड अदिंची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.