ग्रामसभा न घेणाऱ्या बिलोली तालुक्यातील गागलेगाव ग्रामपंचायत सरपंचांचे सदस्यत्व रद्द..

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचे आदेश...

308

 

बिलोली प्रतिनीधी – रवि कांबळे

 

बिलोली तालुक्यातील गागलेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वर्षभराच्या विहित मुदतीत ग्रामसभा न घेतल्याने त्यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकरी यांनी नुकताच दिला आहे. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे.

- Advertisement -

राजेश्वर व्यंकटराव पाटिल असे कारवाई झालेल्या सरपंचांचे नाव आसून गागलेगाव ग्रामपंचायतींच्या जानेवारी 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट मतदारातून सरपंच म्हणून राजेश्वर व्यंकटराव पाटिल हे विजयी झाले होते .परंतु त्यांनी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या आर्थिक वर्षात ज्या चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. त्या घेतल्या नसल्या मुळे हानमंत साहेबराव कामोले व यांच्या सहकार्याकडून या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन 02/02/2022 रोजी सरपंच राजेश्वर व्यंकटराव पाटिल यांचे  सदस्यत्व रद्द करण्याचे  निर्देश दिले आहे .

जिल्हाधिकारी विपीन ईटनकर या प्रकरणी सुनावणी घेऊन मासिक सभा नियमित न घेणे, मासिक सभेचे झालेले कामकाज वेळेवर व वस्तुनिष्ठ स्वरूपात इतिवृत्त नोंदवहीत न नोंदविणे, शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 प्रमाणे ग्रामसभा आयोजित न करणे इ. कामे सरपंच यांनी कार्यकारी प्रमुख म्हणून करून घेणे आवश्यक होते, तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते असल्याचे कारण देत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 (1) अन्वये सरपंच राजेश्वर व्यंकटराव पाटिल यांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करीत असल्याचा जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी आदेश दिला असून या बाबतची संबंधितांना अंमलबजावणी करण्या बाबत कळविले आहे.

एखाद्या ग्रामपंचायतीची मासिक सभा व गावची ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी सरपंचास सरपंचपद व सदस्यपद ग्रामपंचायतीच्या उर्वरित काळासाठी अपात्र ठरवण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रसंग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.