मराठ्यांचे क्रांतिसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील

पुण्य सम्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... 

414

 

 

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता, लढाऊ आणि बाणेदार वक्तव्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देणारा, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता म्हणूनच अण्णासाहेब जावळे-पाटील यांची महाराष्ट्राला ओळख राहिली.

- Advertisement -

               अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे मूळ गाव मेंढा (जि. उस्मानाबाद) होते. त्यांचे वडील सिद्राम जावळे-पाटील हे सुरवातीला तुंगी (ता. औसा) आणि तेथून लातूरला स्थायिक झाले. वडील शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी काही वर्षे शेतकरी संघटनेचे कार्य केले होते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब जावळे विद्यार्थीदशेपासूनच आक्रमक होते. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते विविध समस्यांविरुद्ध चळवळी करू लागले. त्यांनी मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन स्थापन केले.
उत्कृष्ट भाषणशैली, निर्णयक्षमता आणि मागचा-पुढचा विचार न करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडा आणि महराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढला. समाजाचा प्रश्‍न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीत राज्यभरातील युवकांचे नेते बनले. त्यामुळेच गाव तिथे संघटना आणि युवकांचा जत्था तयार झाला.

 

‘छावा’ संघटनेच्या सुरवातीच्या काळात खासगी शिकवणी बंद करण्यासाठी त्यांनी केलेली आक्रमक आंदोलने गाजली. जिल्हा परिषदेतील डॉ. संजय मुखर्जी या आएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला संघटनेच्या युवकांनी सामाजिक प्रश्‍नावर “जाब’ विचारताना अवलंबलेली “छावा’ची कार्यशैली देशभर गाजली. त्यातून छावाचा जो धाक निर्माण झाला त्यामुळे आंदोलनांची गरजच पडत नव्हती. छावा संघटनेने निवेदन देऊन मागणी केली की प्रशासनाला दरदरून घाम फुटायचा!
शेकडो सामाजिक प्रश्‍न हाताळत अण्णासाहेब जावळे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हे, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात संघटना मजबूत केली. त्यांचे हजारो कार्यकर्ते नेत्यासाठी समर्पण द्यायला तयार झाले नि आजही तयार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. आई तुळजाभावानीच्या नावाने तुळजापूर ते औरंगाबाद मराठा आरक्षण जनजागृती यात्रा काढून प्रबोधन केले. डिसेंबर 2012 मध्ये नाशिक ते मुंबई आरक्षण दिंडी काढली. आरक्षण न मिळाल्यास येत्या निवडणुकीवर परिणाम होईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.
मराठा आरक्षण हक्क परिषद घेतली. दलित चळवळीतील नेत्यांना आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे माजी खासदार रामदास आठवले, भाजपचे नेते विनोद तावडे हे त्यांच्या मतांसी सहमत होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांना ते त्यांचे विचार पटवून देत असत.

 

कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा निषेध म्हणून “छावा’ने कर्नाटकातून येणाऱ्या एसटी बसेस फोडल्या होत्या. कर्नाटकातही संघटनेचे जाळे विस्तारले आणि मराठी माणसांची मजबूत फळी निर्माण केली. त्यामुळेच अण्णासाहेब जावळे यांना “मराठ्यांचे क्रांतिसूर्य’ यांसारखी विविध रूपके मिळाली.

 

अश्या महान मानवाचा देह 5 फेब्रुवारी ला अनंतात विलीन झाला त्या निमित्त त्यांना विनम्र आदरांजली💐💐💐

 

शेषेराव प्रल्हादराव बेलकर

अखिल भारतीय छावा संघटना

नायगाव ता. उपाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.