जिल्हाधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे नायगावच्या तहसीलदारा कडून शासनाला चुना मुरुम उत्खननाच्या नावाखाली कंत्राटदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्याची चांदी.

287

नायगांव / प्रतिनिधी  रामप्रसाद चन्नावार 

नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील असलेले राजगडनगर येथील गट क्रमांक १९३ मधून १०० ब्रास मुरुमाच्या उत्खननाची परवानगी घेवून जवळपास दहा हजार ब्रास अवैध उत्खनन करण्यात आले असतांना सुद्धा या प्रकरणी कारवाई करण्या ऐवजी दोषींना लालसे पोटी जिल्हाधिकाऱ्यासह नायगांव तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कडून महसूल विभाग करत असून महसूल विभागाचा कारनामा कंत्राटदार, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार अदिंच्या संगणमताने शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्याचे काम तहसीलदार करत असलेले उघड झाल्या नंतर ही जिल्हाधिकारी या प्रकरणी कार्यवाही करण्यास दिरंगाई करत आहे

तालुक्यातील मागील दोन तीन महिण्यापासून माती, वाळू व मुरुम माफीयांनी प्रचंड धुमाकूळ घातला असतांना सुद्धा नायगावचे तहसीलदार हे दुसऱ्यादा वादग्रस्त झाले असल्यामुळे गजानन शिंदे यांचीच या माफीया सोबत मौज मज्जा करत असल्याचे माफीयाची भीती तहसीलदारा समोर झिरो झाली असल्यामुळे राजगडनगर येथील खाजगी गटात परवानगी देण्यात आली व येथील गायरान जमीनीतून उत्खनन करण्याचा असाच प्रकार चालू असून ५० ते १०० ब्रासची परवानगी मलिदा घेऊन घ्यायची आणि हजारो ब्रास उत्खनन करायचे असाच तहसीलदाराचा गौरख धंदा चालू असून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चुना लागत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

 कोकलेगाव येथील पुलाच्या दोन्ही कडेच्या बाजूला भर टाकण्यासाठी या कामाचे कंत्राटदार अंकूश पवार यांनी राजगडनगर येथील गट क्रमांक १९३ मधून १०० ब्रास मुरुमाच्या उत्खननाची परवानगी घेतली. मात्र उत्खनन हजारो ब्रासचे करण्यात आले या प्रकरणी अनेक वर्तमान पत्रातुन वस्तुनिष्ठ आणि धारधार बातम्याही आल्या पण कंत्राटदाराच्या अर्थिक ओझ्याखाली दबलेले वादग्रस्त तहसीलदार गजानन शिंदे यांनी दखल घेतली नाही तक्रारींना केराची टोपली दाखवली. दुसरीकडे बदली झालेले तत्कालीन उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले पण तहसीलदारांनी जमदाडे यांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या आहेत

————————————-
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मुरुमाचे उत्खनन झाल्यानंतरही तहसीलदार हातावर हात ठेवून बसल्याने याबाबत पुराव्यासह जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे तक्रारी झाल्या. या तक्रारीनंतर मंडळ अधिकारी शेख नवाज तलाठी मुधळे यांनी कंत्राटदार अंकुश पवार यांच्यामार्फत राजगडनगर येथील गट क्रमांक १९३ मध्ये उत्खनन केलेला खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वास्तविक खड्डा बुजवण्यात आला असला तरी ज्या पुलाच्या कामावर मुरुम टाकण्यात आला तो मात्र लपवता आला नाही हे विशेष. महसूल विभागाची घाऊक बदनामी झाल्यावर व तक्रारी नंतर खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

—————————————
वास्तविक या प्रकरणात सखोल चौकशी करून कंत्राटदारासह दोषी असलेले मंडळ अधिकारी शेख व तलाठी मुधळे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. त्याचबरोबर राजगडनगर प्रकरणात अर्थिकद्रष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदारांनाही जाब विचारणे आवश्यक असतांना जिल्हाधिकारी एवढ्या गंभीर प्रकरणात मौन धारण केले आहेत. यामुळे नायगांव तालुक्यात उलटसुलट चर्चेला तर मोठ्या प्रमाणात तोंड फुटले असून या अवैध उत्खनन प्रकरणातील हिश्याचे लाभार्थी तर नाहीत ना अशी शंकाही व्यक्त केल्या जात आहे.
———————————————-

Leave A Reply

Your email address will not be published.