प्रो.डॉ. कल्याणचक्रवर्ती यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार संपन्न

178

नायगांव / प्रतिनीधी ( रामप्रसाद चन्नावार )

येथील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर एकदिवसीय सेमिनारसाठी हैद्राबाद येथील प्रो. डॉ.कल्याण चक्रवर्ती यांनी प्रमूख पाहुणे म्हणून आले असतांना त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम ग्रंथालयास भेट दिली असता ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. भरत लोकलवार व त्यांचे सहकारी बालाजी कावडे यांनी मान्यवरांचे पुष्पहार घालून सत्कार केला.

डॉ. भरत लोकलवार हे अतिशय व्हिजनरी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांनी या महाविद्यालयातील ग्रंथालयाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. महाविद्यालयात कोणताही पाहुणा आल्यानंतर प्रथमतः ग्रंथालय पाहण्याचा विचार केल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी देखील मोठया आत्मविश्वासाने ग्रंथालय दाखविण्यासाठी तत्पर असतात.

- Advertisement -

ग्रंथालय पाहिल्यानंतर डॉ. चक्रवर्ती यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. माणसाचे ह्दय जसे आतिशय महत्वाचे असते त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथालय असते त्या पद्धतीनेच डॉ. लोकलवार यांनी व्यवस्था केली आहे. ग्रंथालयामुळेच महाविद्यालयास चांगले वैभव प्राप्त होईल असे गौरवोद्गार डॉ. चक्रवर्ती यांनी काढले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, प्रो. डॉ. बलभीम वाघमारे, प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, ग्रंथपाल डॉ. भरत लोकलवार, प्रा.डॉ. साईनाथ वाघमारे, बालाजी काळे महाराज, देवीदास भाकरे ई उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.