गावठी पिस्तुल चार जिवंत काडतुसे, एक तलवार सह पांच लाख शाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त

रामतिर्थ पोलिसांची धाडसी कारवाई

271

 

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

स्विफ्ट डिझायर कार मध्ये विना परवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला रामतिर्थ पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातुन एक गावठी पिस्तूल, चार जिवंत कारतुसे, एक तलवार आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकुण पाच लाख शाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही घटना दि.३१ डिसेंबर च्या रात्री साडेबाराच्या सुमारास नरसी येथे घडली. रामतिर्थ पोलिस ठाणे हद्दीत पिस्तूल सापडण्याची ही दुसरी घटना असल्याचे सपोनि विजय जाधव यांनी सांगितले.
मुक्तार पी हैदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शंकर शिंदे यांच्यावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

दि.३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेबाराच्या सुमारास नायगाव येथील संतोष व्यंकट शिंदे यांने नरसी पेट्रोलपंपावर वाद करून तलवार काढून दाखविला व तो स्विप्ट डीझायर गाडी क्र MH-26 AK-6729 मध्ये बसुन नरसी चौकाकडे येत असल्याची माहिती सपोनि विजय जाधव यांना मिळाली होती.त्याच वेळी सपोनि विजय जाधव यांनी चालक रमेश राठोड यांच्या समवेत नरसी चौकामध्ये वरील नंबरची कार थांबुन गाडीची तपासणी केली असता चालकाचे सीटचे खाली एक सिलव्हर रंगाची गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एक तलवार आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकुण पाच लाख शाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

मुक्तार पी हैदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शंकर शिंदे याच्याविरुद्ध कलम 3/25,4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुुढील तपास सपोनि विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लतिफ शेख हे करीत आहेत. आरोपीस आज रोजी अटक केली असून त्यास नायगाव येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.