कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकरी विविध योजने पासून वंचित

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व लाभ तात्काळ मिळवून द्या.

370

 

 

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शासनातर्फे मोठा गाजावाजा करीत 2018 ते 2019 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प “पोखरा’ हाती घेण्यात आला.

- Advertisement -

नायगाव तालुक्यातील २४ गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प “पोखरा’ योजनेत राबविण्यात येत आहे. परंतु येथील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष देऊन सर्वंच शेतक-यांना लाभ मिळावेत यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी गोसावी यांना निवेदन देण्यात आले आहे.

   नायगाव तालुक्‍यातील २४ गावांचा नानाजी कृषी संजीवनी योजनेत गेल्या तीन वर्षापासून समावेश असून अद्यापपही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच खरीप हंगामात कृषी विभागाकडून येणारे बियाने व ओषधी व मार्गदर्शन मिळत नाही त्याचं बरोबर ऑनलाईन अर्ज करुन मिळालेली बियाने व औषधी लाभार्थ्यांना न देता परस्पर शेतक-यांकडुन अर्थीक व्यव्हार करुन दिले जाते . शेतकऱ्यांचे पूर्व समितीचे विषय व बिलाचे विषय तात्काळ मार्गे लावावेत व शेतकर्याना प्रशिक्षन शिबिर लाबण्यात यावेत अन्यथा कृषी कार्यालय नायगाव येथे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन नायगाव तालुका कृषी अधिकारी गोसावी यांना दिले आहे.

यावेळी माधवराव चिंतले टाकळीकर, परमेश्वर पाटील धानोरकर, गजानन पाटील होटाळकर, सुरेश पाटील खंडगावकर ,विठ्ठल  गवळी ,गजानन पाटील चव्हाण, परमेश्वर पा. जाधव कांडाळकर,रामकिशन पालमवार , साहेबराव चट्टे मुगावकर .शिवाजी सालेगावकर, गोविंद डाकोरे, साहेबराव पाटील कदम, बालाजी लव्हाळे ,श्याम चोंडे टाकळीकर, निळकंठ ताकबिडकर, देविदास सुपेकर ,सटवाजी मोदलवार,श्रीनिवास जाधव, संगमेश्वर जिरगे, भागवत जाधव, भुजंग होनराव ,नारायण कोसंबे ,देविदास डोणगावे, साहेबराव सुरेकर, अनिकेत कोकणे, अशोक टोंपे रामदास कांगडे ,शिवहर ताटे ,मोला पाळेकर, प्रकाश महिपाळे, नागोराव गायकवाड, बालाजी डोणगावे, संतोष जाधव ,हनुमंत जाधव, मालू झरेकर, साईनाथ जाधव, नागनाथ मुंडकर मरवाळीकर, प्रमोद मुंडकर, लक्ष्मण पाटील कंदूरके, ज्ञानेश्वर ताटे ,विजय काढले, किशन नुकूलवार, सटवाजी मोदरवाड .शिवाजी शंकरराव, माधव कदम सह आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.