मांजरम येथे दिवसा ढवळ्या चोरी, श्र्वानपथक व फींगरप्रिंट पथकाला पाचारण.

190

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

मांजरम येथे चोरट्यांनी दिवसा ढवळ्या घराचे कुलूप उघडून घरातील नगदी रोकड व सोन्याची दागीने लंपास केल्याची घटना घडली.या चोरीमुळे नायगांव पोलासांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथक, फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करून चोरीचा कसून तपास केला परंतु चोरांचा ठावठिकाणा लागला नाही.
मांजरम येथील शेतकरी बालाजी रामचंद्र शिंदे यांचे घर जुन्या पोलीस चौकी नजीक आहे .दिनांक 2८ डिसेंबर रोजी शिंदे कुटुंब घराला कुलूप लावून नियमित सवयी प्रमाणे चावी विशिष्ट ठिकाणी ठेवून बसस्थानक नजीक असलेल्या नवीन बांधकाम केलेल्या घराकडे गेले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून सकाळी ११:४५ ते दुपारी 3:४५ च्या दरम्यान घराला लावलेले कुलूप उघडून घरात शिरून घरातील कपाटातील नगदी 2 लाख ५० हजार व १लाख ७४ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने असा ४ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला.बालाजी शिंदे सायंकाळी चारच्या दरम्यान घराकडे जेवण करण्यासाठी आला असता घरांचे दार व घरातील अलमारीचे दार उघडे दिसले.सदरील घटनेची माहिती नायगांव पोलिस स्टेशनला दिली असता.पोलीसांनी श्र्वानपथक व फींगरप्रिंट पथकाला पाचारण केले परंतु चोरट्यांचा शोध लागला नाही.सदरील घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चांडक यांना दिली.नायगांव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस.बाच्चावार ,ए.के.वाघमारे,ए.एस.शेख,बाबु चरकुलवार,बळी कोन्केवाड आदी करीत आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.