माता व बालमृत्यू रोखण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय 21 असणे योग्य आहे.

नायगाव ग्रामीण रुगणालयाचे अधीक्षक  डॉ.एच.आर. गुंटूरकर यांचे प्रतिपादन

235

 

 

 

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

मुलीच्या लग्नाच्या वयासंबंधी केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा कमी वयामध्ये लग्न केल्यानंतर मुलीवर होणारे दुष्परिणाम रोकण्यास मदत होईल असे प्रतिपादन नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एच.आर. गुंटूरकर यांनी शरदचंद्र महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने ” मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयासंबंधी वैद्यानिक आधार ” या विषयाच्या अनुषगाने मार्गदर्शन करतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू हे होते. 

- Advertisement -

 पुढे बोलताना डॉ. गुंटूरकर म्हणाले की, कमी वयामध्ये लग्न झाल्यामुळे आणि कमी वयातच माता झाल्यामुळे 13% महिलांचे बाळांतपणा मध्येच मृत्यू होते याशिवाय त्यांची बौद्धिक, शारीरिक व मानसिक परिपक्वता नसल्यामुळे मुलीचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडू शकते. कमी वयात लग्न झाले असले तरी मुल लवकर व्हावे अशी सासरच्या मंडळीबरोबरच सर्वच नातेवाईकांची इच्छा असते पण तिच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र कोणीही चिंता करीत नाही.विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर पाच वर्षानी मुल होऊ द्यावे व त्यानंतर तीन वर्षांनी दुसऱ्या मुलाच्या जन्माचा विचार केला पाहीजे पण प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही त्यामुळे सर्वच बाबतीत परिपक्वता येण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय 21 वर्षे असावे.

     स्त्री मजबूत असेल तरच जन्मनारी पिढी सुदृढ असू शकते पर्यायाने देश मजबूत होतो. स्त्रीयां व मुलीना प्रोटीन युक्त आहार कसे मिळेल?चांगते आणि मोफत शिक्षण कसे मिळेल? त्यांना स्वतःच्या पायावर उभे टाकण्यासाठीची आर्थिक सुबत्ता कशी येईल? याबाबीकडेही केंद्र शासनाने अधिक लक्ष द्यावे म्हणजे मुलीचे वय वाढले तरी पालकांनी चिंता करणार नाहीत अन्यथा मुलींना शिक्षण आणि रोजगार नसल्यास त्यांचे मानसिक संतुलन देखील योग्य राहणार नाही म्हणून लग्नाच्या वयासंबंधी कायदा करताना या बाबी देखील विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, केंद्र शासनाने मुलीच्या लग्नाचे वय तीन वर्षानी वाढून 21 वर्ष केले ते अभिनंदनीय आहे पण प्रत्येक मुलींना स्वतःच्या पायावर उभे टाकून स्वांवलंबी बनण्यासाठी सरकारने नियोजन करावे आणि पालकांनीही मुलींना उच्च शिक्षण शिकविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे कारण 18 वर्षामध्ये केवळ 12 वी पर्यन्तचे शिक्षण पूर्ण होऊ शकते आणि लग्न झाल्यानंतर मुली शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात म्हणून पुढील शिक्षण घेण्यासाठी किमान 3-4 वर्षे लागतात त्यामुळे 21 वर्ष हे विवाहाचे योग्य वय आहे असे त्यांनी म्हणाले.

यावेळी प्रा.डॉ. साईनाथ वाघमारे यांनीही आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन लोकप्रशासन विभागप्रमूख डॉ. शंकर गड्डमवार यांनी केले तर आभार लोकप्रशासन विभागाचे प्राध्यापक संजय गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्रो. डॉ. प्रकाश नांगरे, प्रो. डॉ. दादाराव पानपट्टे, प्रो. डॉ. बलभीम वाघमारे, प्रो. डॉ. श्रीरंग वट्टमवार, ग्रंथपाल डॉ. भरत लोकलवार, प्रा.डॉ. गोविंद परडे, प्रा.डॉ. बालाजी गायकवाड,प्रा.डॉ. रोकडे, प्रा.डॉ. चट्टे, प्रा. रामानंद काळे, प्रा. गायकवाड देगावकर, बालाजी काळे महाराज, संदिप बकवाड, उमेश चव्हाण, प्रशांत मोरे, संतोष भालेराव यांच्यासह विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.