पांचपिंपळी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर

परिसरातील जास्तीतजास्त नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा - सरपंच कमलकिशोर पाटील यांचं आवाहन

214

बिलोली प्रतिनिधी –    रवी कांबळे

तालूक्यातील पाचपिंपळी येथे उद्या दि.22 डिसेंबर रोजी कै.गंगाबाई रावसाहेब पाटील याच्या पूण्यस्मरणार्थ भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील कार्यक्रम व्हीजन फाऊडेशन इंडीया उदयगीरी लायन्स नेत्र रूग्णालय उदगीर व साई शिक्षण संस्था पाचपिंपळी याच्या विद्यमाने आयोजीत करण्यात आलेला आहे.सदरील कार्यक्रम गंगाबाई पाटील नसंर्सींग स्कुल पाचपिंपळी येथे आयोजीत करण्यात आले. रूग्णानी शस्त्रक्रियेसाठी येतांना आधार .बी.पी.एल,राशन, मतदान या सर्व कागदपत्राची झेराँक्स सोबत आणावे असे आव्हान शिवाजी पा.पाचपिंपळीकर यांनी केले.शिवाजी पा.पाचपिंपळीकर यांनी करत असलेल्या सामाजीक कार्यांचे परीसरात कौतूक होत आहे तसेच नगरीचे सरपंच – कमलकिशोर आनंदराव पाटील,उपसरपंच-सौ. इंदरबाई जयराम रामपुरे,ग्रामसेवक ,
एस.बी.शिंदे,व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पण गावात गावात विकासात्मक कार्य करत आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.