नायगाव नगर पंचायतच्या अकरा जागेसाठी आज मतदान

११ प्रभागातील ८ हजार ०९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावनार

230

नायगाव : शेषेराव कंधारे

         आज होणा-या नायगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी ११ प्रभागाच्या १३ मतदान केंद्रावर सोमवारी कर्मचारी ईव्हीएम मशीन व निवडणुकीचे साहीत्य घेऊन नायगाव तहसील येथून वाहनातून संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले असुन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी,तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या हस्ते नारळ फोडून वाहन संबधित केंद्राकडे रवाना करण्यात आले .

           नायगाव नगर पंचायतीच्या होऊ घातलेल्या १७ प्रभागाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १७ प्रभागांपैकी ३ प्रभाग ओ बी सी. आरक्षणामुळे या प्रभागातील निवडणूक रद्द करण्यात आली असून ३ प्रभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर प्रभाग क्रं १) बेळगे नगर मध्ये दोन बुध,२)बळवत नगर,४)सिध्दार्थ नगर,५)विठल नगर,८)व्यंकटेश नगर,१०)जुनी झोपडापटी,१२)वसंत नगर,१३)भाजीपाला मार्केट परिसर,मदेवाड गल्ली अमृत नगर मध्ये दोन बुथ,१५ कल्याण गल्ली,१६)चव्हाण गल्ली या ११ प्रभागासाठी १३ मतदान केंद्रावर आज मंगळवारी मतदान होणार आहे.

- Advertisement -

      तिन उमेदवार बिनविरोध निघाले असले तरी बाकीच्या प्रभागातील निवडणूक अतितटीची होत आहे.

११ प्रभागातील १३ मतदान केंद्रासाठी १७ पथके तयार करण्यात आले आहेत. या १७ पथकामध्ये एकूण ६८ कर्मचारी आहेत अशी माहिती निवडणूक सहाय्यक राजेश आलमवाड यांनी दिली आहे. या मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीकांत निळे, तहसीलदार गजानन शिंदे,उपअभियंता बी.डी.नंदगावकर,मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर,अधिक्षक संताराम जाधव हे काम पाहत आहेत तर येथील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी , एक पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस उपनिरीक्षक , ८० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती नायगाव चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.