शरदचंद्र महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्दघाटन संपन्न

172

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

शरदचंद्र महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्दघाटन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफ़ेसर डॉ. बलभिम वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरिबाबू सर हे होते . प्रोफ़ेसर डॉ. बलभिम वाघमारे सर यांनी विद्यार्थ्यांनी वाचनासाठी अधिक वेळ द्यावा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. प्राचार्य डॉ. के हरिबाबू सर यांनी विद्यार्थ्यांनी पदविच्या तिन वर्षात अधिकाधिक ज्ञान ग्रहन करुन संपन्न व्हावे यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशिल राहिल असे आश्वासन दिले. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक म्हणुन प्रा. संजय गायकवाड व डॉ. राजेश रोकडे सर यांनी विद्यार्थ्यांना या केंद्राबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्याम पाटील सर, प्रा.डॉ. साईनाथ वाघमारे ,प्रा वृदावन नामवाडे,प्रा. सुभास गायकवाड हे उपस्थिती होते कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. गोविंद परडे यांनी मांडले. कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.