स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एम जे या विषयात ससाणे नंदकुमार नारायण यांनी मिळविले सुवर्णपदक ..!

स्कुल ऑफ मिडिया संकुलाचे संचालक व प्राध्यापक यांच्यासह मित्रमंडळीनी केला अभिनंदनाचा वर्षाव

195

 

 

नांदेड /प्रतिनिधी- आनंद गोडबोले

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2020 व 2021 वर्षासाठीचे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये स्कूल ऑफ मिडिया स्टडीज संकुलाच्या ससाने नंदकुमार नारायण यांनी एम जे प्रिंट मीडिया या अभ्यासक्रमात विद्यापीठातून सर्वाधिक गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्यासह पदवी मिळवली त्याबद्दल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ सोहळा

- Advertisement -

          दिनांक 2 डिसेंबर रोजी विद्यापीठातील सिनेट हॉलमध्ये झालेल्या सत्कार समारंभ सोहळ्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड येथील निसार तांबोळी, विद्यापीठ कुलगुरू उद्धव भोसले , प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक रवी सरोदे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले त्यामुळे स्कूल ऑफ मीडिया स्टडीज या संकुलाचे संचालक प्राध्यापक आणि मित्रमंडळी यांनी नंदकुमार यांच्या विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला.

स्कूल ऑफ मीडिया स्टडीज संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, प्राध्यापक डॉ.राजेंद्र गोणारकर, प्राध्यापक डॉ. सुहास पाठक, प्रा डॉ. सचिन नरंगले, प्रा.यादव सर, प्रा.पुंडगे सर आणि आकाशवाणीच्या प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले लोककलावंत विनोद गोडबोले आष्टुर चे सरपंच दत्‍तराव ससाने यांच्यासह मित्रमंडळी यांनीअभिनंदनाचा वर्षाव केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निसार तांबोळी (विशेष पो.महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र) यांनी बोलताना म्हणाले की,हा सन्मान ‘कोव्हिड 19’च्या काळात मिळवून दिल्याबद्दल मा.कुलगुरू उध्दव भोसले यांचे अभार मानने गरजेचे आहे. हि सन्मान काही विध्यार्थ्यांच्या जिवनात पहिला आणि शेवटचा असु शकतो.जे व्यक्ती हारले म्हणून निराश होवुन प्रयत्न न सोडता जिद्दीने कार्य करतात. व जे व्यक्ती जिंकले म्हणून जास्त आनंदाने कार्य करणे सोडतील त्यांना शेवटची वेळ असु शकते.कोव्हिड 19 च्या लढतीला सर्वांनी तयार रहावे.

                     त्यानंतर अध्यक्षिय भाषणात कुलगुरू उध्दव भोसले म्हणाले की, प्रमुख पाहुणे निसार तांबोळी या कर्तबगार अधिकार्यांचे अभार मानले. हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क हे फार म्हत्वाचे आहे.राष्ट्राचा विकास करण्यासाठी विध्यार्थ्यांनचा सहभाग फार महत्त्वाचा असतो.
येणाऱ्या काळात येथील विध्यार्थी टिम करतील असे मला वाटते. सर्व विध्यार्थ्यांनच्या भावी अविष्यासाठी शुभेच्छा देवुन सर्वांचे अभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी  अभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र गोणारकर यांनी केले. यावेळी मंचावर रवि सरोदे परिक्षा नियंत्रक,आनंद बालपुते वित व लेखाअधिकारी, डॉ शिवराज बोडके संचालक राष्ट्रीय सेवा योजना, यांची हि प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.