शेतीपंपांचा तोडलेला विज पुरवठा २४ तासात जोडा, अन्यथा महावितरण उपकेंद्राला ताळे ठोकू – मांजरम च्या संतप्त शेतकऱ्यांचा इशारा.

522

नायगाव प्रतिनिधी – 

           महावितरण ने शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाचा विचार न करता हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांचे शेती कृषी पंपांचे विदयुत जोडणी कापण्यास सुरवात केली त्यामुळे मांजरम गावातील शेतकरी व  नवयुवक हे चांगलेच संतप्त झाले व त्यांनी निवेदनाद्वारे महावितरण उपकेंद्र मांजरम यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचे निवेदन दिले आहे..

          गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाचा हातातोंडाशी आलेला खरीप हंगामात पूर्णपणे उध्वस्त झाला आसून ढगाळ हामामान आणी अनिश्चित पावसामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे लागतील ह्याची कोणतीच आश्वासकता नाही. त्यातच महावितरणाने वीजबील वसूलीसाठी मांजरम परिसरातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली आसून सदर शेतीपंपांचा वीज पुरवठा चोवीस तासांच्या आत जोडून देण्यात यावा अन्यथा महवितरण उपकेंद्राला ताळे ठोकू अश्या इशाऱ्यांसह मांजरम येथील शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण उपकेंद्र मांजरम येथे निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी राहूल शिंदे, माधव शिंदे, शिवाजी शिंदे, बालाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, व्यंकट शिंदे, संजय जाधव, धनंजय जाधव, रामदास शिंदे, साईनाथ जांभळे, तेजेस शिंदे, शिवराज शिंदे, देवानंद शिंदे, बालाजी शिंदे, नागोराव गायकवाड, संभाजी शेट्टेवाड, बाळू शिंदे, नागोराव शिंदे आंनदा नव्हारे ई कार्यकर्ते उपस्थित होते.

1 Comment
  1. Sainath yashwant Pillewad says

    Great

Leave A Reply

Your email address will not be published.