नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या – नायगाव महसुल कर्मचारांचे कामबंद आंदोलन सुरू

301

 

नायगाव/शेषेराव कंधारे

हदगाव तालुक्यातील तामसा येथे नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघांच्या वतीने कामबंद आंदोलन करीत तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
             

- Advertisement -

            पोलीसांनी कोणतीही शहानिशा न करता नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, खोटे गुन्हे दाखल करणा-या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी,

या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नायगाव तालुक्याच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करत निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील जाधव, नायगाव तालुका अध्यक्ष एस.के.मुंडे,तालूका उपाध्यक्ष बि.एस.राठोड, सचिव येसेकर हेमंत, ए.एन.मुखेडे,मंडळ अधिकारी डी.डी.कळलेकर,डि.व्ही.पांडे, तलाठी एस.एम.कोकरे,एन.एम.शेख,
डि.व्ही.डावरगावे,आर.ए.शेख,एस ‌एस.शाहणे,जि.एस.काळे,बि.एम.मुळे,बी.एस.मुधळे,व्हि.बी.संगेवार,व्हि.एस.गुंजकर,एस.आर.हसनपल्ले,बोडले यांच्यासह तालुक्यातील अनेक तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.