त्या भष्टाचारी रातोळीच्या सरपंच व ग्रामसेवकांवर आठ दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करु आशा आश्वासनानंतर उपोषण मागे
नायगाव : शेषेराव कंधारे
रातोळी ता.नायगाव या गावाला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतुन कामे न करताच जवळपास १४ लाख ६७ हजाराचा अपहार सरपंच व ग्रामसेवकांने केल्याचे चौकशीतुन उघड झाले .त्या भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा यासाठी सोमवारी नायगाव पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात आले.
पंचायत समितीचे प्रभारी बिडिओ रामोड यांच्याकडून आठ दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्र्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
भाजपाचे विधान परिषदेचे आ.राम पाटील रातोळीकर यांच्या गावात आ.रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ,उपसरपंच निवड झाली होती .गावाला मिळालेल्या पंधरा वित्त आयोगाच्या निधीतुन कामे न करताच सरपंच व ग्रामसेवकांनी रक्कम परस्पर इतरांच्या खात्यावर वर्ग केले या बाबत गावातील युवक अंकुश पाटील यांनी चौकशी करण्यासाठी लेखी तक्रार गटविकासाधिका-यां कडे केली होती .तक्रारीची दखल घेऊन गटविकासाधिकारी फांजेवाड यांनी चौकशी साठी विस्तार अधिकारी कांबळे यांना पाठविले या बाबत चौकशी होऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन कामे न करता १४ लाख ६७ हजारांची अपहार केल्याचे सिद्ध झाले होते .
वरील रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांचे कडून, समप्रमाणात आठ दिवसांत वसूल करण्यात यावी असाही चौकशी अहवालात म्हटले असतानाही जवळपास पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप रक्कम जमा केलेली नाही त्यामुळे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच सौ. सुमनबाई पिराजी देशमुख व ग्रामसेवक सुधाकर वडजे हे दोघेही दोषी असुन त्यांनी पदाचा गैरवापर करुन शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी दि.22 नोव्हेंबर रोजी नायगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अमरन उपोषण तक्रारदार अंकुश चंद्रभान पाटील रातोळीकर यांनी केले होते.पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी रामोड यांच्याकडून आठ दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्र्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.