नायगाव सिटी दातांच्या दवाखान्या तर्फे तीन दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिर

809

.

 

————————————–
नायगाव प्रतिनिधी : रामकृष्ण मोरे

नायगाव येथे सिटी दातांच्या दवाखान्या अंतर्गत दि. २४/२५/ व २६ नोव्हेंबर २०२१ रोजी तीन दिवसीय मोफत दंत व मुख आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजूंना रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.राहुल राजेंद्र पांचाळ व डॉ.सौ.अश्विनी राहुल पांचाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

              दातांच्या विविध आजारावर रूग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळावे म्हणून दातांच्या विविध उपचारासाठी नायगाव शहरात नायगाव सिटी दातांच्या दवाखान्या अंतर्गत तीन दिवसीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचे वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत राहणार असून डा.राजेंद्र पांचाळ(दंत शल्यचिकित्सक घाटी रुग्णालय) व डॉ.सौ.अश्विनी पांचाळ(दंत व मुख रोग तज्ञ) हे रूग्णांची तपासणी करणार आहेत.

शिबिरासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी मो.९१७५७०८०७९ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी फिस दहा रुपये आहे. शिबिराचे स्थळ नायगाव सिटी दातांचा दवाखाना मेडेवार कॉम्प्लेक्स इण्डेंण गॅसच्या बाजूला हेडगेवार चौक नायगाव (बा.) असून शिबिरामध्ये मोफत डिजिटल एक्सरे व औषधी वाटप आदी सुविधा देण्यात येणार असून जास्तीत जास्त रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.श्री व सौ.पांचाळ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.