नायगाव पोलिसांची शहरात पुन्हा विशेष मोहीम शहरात पोलिससांचे कौतुक .
नायगाव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुन्हा विशेष मोहीम राबवली असून या मोहिमेत एकूण 73 गुन्हे दाखल करण्यात आले तर चाळीस हजाराच्या जवळपास दंड आकारला आहे. तर शेकडो वाहणावर कारवाही करून हजारोची दंडात्मक कारवाही करण्यात आली.
शहरातील रस्त्यात अडथळा करणारे येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होईल अशा पद्धतीने वर्तणूक करणारे हातगाडी वाले, वाहन, दुकानांमधील माल रोडवर ठेवणारे, दुकानाच्या पाट्या बोर्ड रोडवर ठेवणारे.जे वारंवार सांगूनही ऐकत नाहीत अश्या एकूण पाच आरोपी वर भारतीय दंड विधान कलम 283 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांना तंबी देऊन नोटीस देण्यात आली आहे.
तसेच शहरामध्ये शाळा कॉलेज परिसरात विनाकारण फिरणारे रोड रोमिओ, यांना चोप देऊन त्यांच्या वाहनाची कागदपत्रे चेक करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच शहरामध्ये विनाकारण फिरणारे गाडी चालवतानां मोबाईलचा वापर करणारे रोडवर गाडी उभी करणारे यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शाळा कॉलेज क्लासेस परिसरामध्ये विनाकारण फिरणारे टवाळक्या करत बसणारे टुकार यांना चांगला चोप देऊन कारवाही करण्यात आली. या मोहिमेचे सर्व सुज्ञ नागरिकांतून अतिशय मनापासून स्वागत करून पोलिसांच्या या कार्याला त्यांनी चालना दिली आहे.