डिजिटल मीडिया परिषदेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी शेळगावकर यांची सर्वानुमती बिनविरोध निवड.

387

 

नरसीफाटा /शेषेराव कंधारे 

मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त एस एम देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक प्रजावाणीचे संपादक गोवर्धन बियाणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील कार्यकारणी घोषित केले असून या कार्यकारणीत ग्रामीण भागातून डिजिटल मीडियाचे कार्य करणारे तानाजी शेळगावकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड घोषित केल्याने त्यांच्या या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

- Advertisement -

      तानाजी शेळगावकर हे शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील रहिवासी असून ते गेल्या अनेक दिवसापासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी निर्भीड व निस्वार्थ पणे पत्रकारिता करत असल्याने त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन डिजिटल मीडियाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची ही निवड घोषित करण्यात आल्याने त्यांच्या या निवडीचे शंकर नगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्ल्या..

 

याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार पत्रकार मनोहर मोरे, शेषेराव कंधारे, धम्मानंद भेदेकर, गंगाधर कांबळे आधी सह अनेक जण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.