आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल प्रथम.

125

 

नायगांव / प्रतिनिधी  रामप्रसाद चन्‍नावार 

ब्लू बेल्स इंग्लिश स्कुल नायगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नावीन्यपूर्ण सादरीकरण करीत नांदेड येथील नामांकित शाळा ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल निळारोड नांदेड यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. क्षितिजा बोडके या विद्यार्थिनीने योग्य आचरणातून योग्य समाज घडतो ,योग्य आचारसंहिता व नैतिकमूल्ये मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणतात आणि शिस्तीतूनचं नैतिकता विकसित होते यावर आपले मतप्रदर्शन करीत स्पर्धेत यश संपादन केले.

- Advertisement -

सदरील स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील व तेलंगणातील वीस शाळांनी सहभाग घेतला होता. पोस्टर मेकिंग स्पर्धेत याच शाळेतील ईयत्ता दहावीची शगुन मलाकदार या विद्यार्थिनीने विशेष प्रावीण्य मिळविले. ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, प्रा.रवींद्र पा.चव्हाण ब्लू बेल्स इंग्लिश स्कुलचे संचालक हरीबाबू सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. 

स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलचे संचालक तथा अध्यक्ष श्रीनिवास धावरशेट्टी , सचिव सौ. उमादेवी धावरशेट्टी, मुख्याध्यापक सुबोजीत घोष व ईतर शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.आशिया खान व सौ. अश्विनी भोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.