केरुर येथे मोटारसायकल खाजगी  बसच्या धडकेत एक जण ठार.

1,868

 

 

नायगाव / शेषेराव कंधारे

 

नांदेड देगलूर राज्य महामार्गावर बिलोली तालुक्यातील केरूर वळणदार घाटावर मोटरसायकल व खाजगी ट्रॅव्हल्स बसची धडक होऊन झालेल्या या भिषण अपघातात मोटरसायकल वरील भोपाळा येथील तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

 

- Advertisement -

           सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील पंडित मनोहर बावणे वय ३२ वर्ष हे सासरवाडी असलेली बिलोली तालुक्यातील सगरोळी येथून आदमपूर फाटा मार्गे मोटारसायकल वरुन नरसी कडे येत असताना सदर मोटारसायकल नांदेड देगलूर राज्य महामार्गवरील केरुर घाटावरील वळणं रस्त्यावर येताच नरसी कडून देगलूर कडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी बस क्र.एम- एच-१२ एच.बी.०८५३ यांची जोरदार धडक होऊन मोटारसायकल वरील पंडित मनोहर बावणे हेे जागीच ठार झालेे.

या घटनेचे माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याला मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी तातडीने घटनास्थळी अदमपूर बीट जमादार अशोक इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट बोडके यांना घटनास्थळी पाठवून मयताचे शव नायगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मयत पंडित बावणे यांच्या पश्चात आई-वडील, २ भाऊ, १ बहीण, पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे.

नायगाव येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नातेवाईक आनंदराव पाटील बावणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.