संस्कारक्षम कार्यकर्ता निर्माण करणारा नेता म्हणजे मा.आ.वसंतराव चव्हाण -ह.भ.प.सोपान महाराज

184

 

 

नायगाव / शेषेराव कंधारे                       

मा.आ.वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमत्त असुन कै.बळवंतराव चव्हाण व कै.कलावतीबाई चव्हाण यांची आठवण सतत राहावी यासाठी चव्हाण कुटुंबीयाकडुन कै.चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनेक वर्षांपासून सात दिवसीय सप्ताह ठेवून दररोज नामांकित कीर्तनकारांच्या माध्यमातून आपला कार्यक्रता हा संस्कारक्षम निर्माण झाला पाहिजे हाच मुळ हेतू असुन हे चव्हाण कुटुंबीयांचे कार्य कैतुकास्पद आहे असे गौरवोद्गार प्रसिद्ध किर्तनसम्राट ह.भ.प.श्री.सोपान महाराज यांनी नायगाव येथील कार्यक्रमात भाविक भक्तांनी मार्गदर्शन करताना काढले.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतरावजी चव्हाण यांच्या जन्मदिना निमित्त किर्तन सोहळा व अन्नदान कार्यक्रम दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नायगाव येथील जयराज मंगलकार्यालयात जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी किर्तन सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

अभिष्टचिंतन सोहळ्या च्या सुरवातीला महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनसम्राट ह.भ.प.श्री.सोपान महाराजांच्या किर्तन आशिर्वादानंतर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त सोपान महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करून पुढील कार्यासाठी भरभरून शुभ आशिर्वाद देण्यात आला.

             सोपान महाराज  म्हणाले की राजकीय व्यक्ती जर धार्मिक असेल तर त्याची काम करण्याच्या पध्दत हि स्वच्छ असू शकते.छञपती शिवाजी महाराज हे धार्मिक विचारांचे होते म्हणून त्याचे राज्य जगात सर्वात श्रेष्ठ होते.

अनेक श्रीमंत व्यक्ती आपल्या जिवंत असलेल्या आई वडीलांची सेवा करण्यासाठी मागेपुढे पाहताना प्रत्यक्षपणे पाहाता आहोत परंतु माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी कै. बळवंतराव चव्हाण व कै.कलावतीबाई चव्हाण यांची आठवण सतत स्मरणात राहावी यासाठी असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन परिवारातील सदस्यांना व आपल्या मतदारसंघातील कार्यकत्यांना संस्कारक्षम घडविण्याचे काम माजी आमदार वसंतराव चव्हाण हे करीत असुन इतर राजकीय कार्यकर्त्यांनी असे कार्यक्रम राबवुन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केले.

महाराजांनी आपल्या गोड वाणीतून आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार हि कविता महिला भाविकांच्या आग्रहाखातर सादर केले यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण सह अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.

माझे वडील कै.बळवंतराव चव्हाण व आई कै.कलावतीबाई चव्हाण यांची सतत आठवण व्हावी आणि त्यांच्या पुन्यतिथीच्या निमित्ताने किर्तन प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता हा संस्कारक्षम घडावा हा मुळ हेतू असुन माझा वाढदिवस हा एक निमित्त आहे असे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी वाढदिवसाला उत्तर देताना बोलत होते.

वसंतरावजी चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या निमीतांने आ.अमर राजूरकर,आ.मोहण अण्णा हंबर्डे,आ.जितेश अंतापूरकर, जिल्हा परिषद सदस्या सौ.मिनलताई पाटील खतगावकर, कैलास भाऊ गोरठेकर, संभाजी पा. भिलवंडे, शाम पा. कदम, बापूसाहेब पा.कौंडगावकर,श्रीराम पा. जंगदबे, सुर्यकांत पा. जुन्नीकर, मोईज शेठ, रुद्रा पा. कदम,शिवराज पा. जारीकोटे, बंडू पा. बाभुळगावकर, साईनाथ पा. मोगलीकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, कार्यालयीन अधीक्षक सताराम जाधव, बालाजी पा. कारेगावकर, अवधूत पा. सालेगावकर, ज्ञानेश्वर बोळसेकर,सुरज पाटील शिंदे सह नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच,उपसरपंच, चेअरमन, पोलिस पाटील, असंख्य स्नेहीजन, सांप्रदायिक संघटना, कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्र, परिवार यांच्या वतीने शुभेच्छा देऊन उत्कृष्ठ राजकीय कामगिरी बजावण्याची संधी भविष्यकाळात मिळावी अशी शुभ कामना असंख्य चाहत्याकडून देण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास पा. चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण, प्राचार्य रविंद्र पा. चव्हाण, सुधाकर शिंदे, पांडुरंग चव्हाण, माणिक चव्हाण, बाबासाहेब शिंदे, बालाजी शिंदे, विठ्ठल बेळगे,कोलमवार सह चव्हाण मित्र मंडळांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.