स्वर्गीय प्रदिप पाटील हे ग्रामीण साहित्यीका मधील हिरा होते – श्रीमंगले

261

नायगाव/शेषेराव कंधारे

सर्व समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व ग्रामीण भागातील व्यथा कायम लेखनातून मांडणारे जेष्ठ साहित्यिक स्वर्गीय प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपलीकर हे ग्रामीण साहित्यीका मधील एक अनमोल हिरा होते असे प्रखंड विचार प्रा.वा.ल.श्रीमंगले यांनी व्यक्त केले.

ते कामरसपल्ली ता.बिलोली येथील ग्रामीण प्रसिद्ध साहित्यीक तथा कविकार प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर यांचे दि.१० एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कामरसपली ता.बिलोली येथे श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षपदावरून प्रा.वा.ल.श्रीमंगले हे बोलत होते.
सर्वप्रथम स्वर्गीय प्रदिप धोंडिबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करूण श्रध्दांजली वाहण्यात आली.
या प्रथम पुण्यस्मरणाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग पुठेवाड, लक्ष्मण मलगिरवार, विरभद्र मिरेवाड सर, बालाजी पेटेकर सर,पत्रकार शेषेराव कंधारे,राजेन्ना जंगीलवार, गजानन पा.पवार, अजित कदम, धोंडिबा पाटील कामरसपलीकर या सह आदींची उपस्थिती होती.

 

श्रीमंगले सर म्हणाले की कै.प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर हे खेडेगावात जन्म घेऊन देखील त्यांना लिखाण वाचन सवय होती त्यांच्या गावकळा कादंबरीत वास्तव समोर आणून ग्राम स्वच्छता अभियानाचे योगदान या कादंबरीने समाजाला दिले.होरपळ सारखा कसदार कथासंग्रह,कवितासंग्रहाला राज्य शासनाच्या पुरस्कार बरोबर अनेक पुरस्कार मिळाले होते त्याचं बरोबर सर्वंच समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व ग्रामीण भागातील व्यथा कायम लेखनातून मांडणारे जेष्ठ साहित्यिक स्वर्गीय प्रदिप धोंडिबा पाटील हे होते असेही ते म्हणाले.

विरभद्र मिरेवाड सर म्हणाले की
प्रदिप पाटील सरांचे ‘गावगोठा’ गावतिढा व वाळूची शेती या कादंबऱ्यां प्रकाशनाच्या वाटेवर असलेले अर्धवट स्वप्न आम्ही सर्व साहित्यिक मंडळी मिळुन त्या कादंबरीचे लवकरच प्रकाशन करण्यात येईल असे आश्वासन कुटुंबियांतील सदस्यांना दिले आले.

 

कु.ऋतुजा दिपक पाटील म्हणली की मोठे पपा तुम्हचे जे काही अधुरे स्वप्न राहिलेली आहे ते पुर्ण केल्यानंतरच आम्ही खरी तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करु व आपल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुढच्या वर्षीपासून आठवण म्हणून आपल्या सारखे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गजानन पा.पवार,प्राध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग पुठेवाड, लक्ष्मण मलगिरवार, बालाजी पेटेकर यांनीही स्वर्गीय प्रदिप धोंडिबा पाटील यांच्या कार्यावर सविस्तर विचार मांडले.
या प्रथम पुण्यस्मरणाला आनंदराव पाटील बावणे, संदिप पाटील रातोळीकर, पत्रकार अशोक पाटील, दादाराव पाटील, वसंत पाटील, दिपक धोंडिबा पाटील, आनंदराव पाटील जाधव, मोहनराव पा कदम, बालाजी जाधव, रामराव पाटील,भारत पाटील, बाबुराव जाधव, नामदेव पोलिस पाटील, व्यंकटराव पाटील, गंगाधर पाटील, यादव पाटील, माधवराव पाटील, लक्ष्मण पा., संभाजी पाटील, नारायण पाटील, हणमंत सालेगावे, पंडीत मालेगावे , विजय कल्याण,शाम पाटील, माधव सुर्यवंशी,बाबु चिखले, राजेश शिररामे यांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.