रस्ता सुरक्षा अभियानचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असावा – पो.नि.अभिषेक शिंदे

166

नायगाव/ शेषेराव कंधारे

रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान हा महत्त्वाचा विषय असून दिवसेंदिवस होणाऱ्या विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असून प्रत्येकानी वाहन चालविताना सुरक्षित राहण्यासाठी या रस्ता सुरक्षा अभियानचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असावा असे मत पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी व्यक्त केले.

गडगा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे तर व्यासपीठावर बालाजी बच्चेवार, विठ्ठलराव कत्ते, बालाजीराव एकाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गिरीधरराव हत्ते, शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी पन्नासे, जीवन चव्हाण, हनुमान शिंदे, संभाजी पाटील शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

- Advertisement -

पो.नि. शिंदे बोलताना पुढे म्हणाले की रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची माहिती, वाहनाच्या वेगमर्यादा, वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे, ऊसगाडी वाहन बैलगाडीला स्टिकर चिटकवून होणाऱ्या अपघाता पासून बचाव करण्यासाठी उपलब्ध साधन समृद्धी व स्टिकर या बाबत जनजागृतीसाठी अभ्यासक्रमात समावेश असणे गरजेचे असून कै. गणपतराव पाटील सेवाभावी संस्थेच्या हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे असल्याचे व्यक्त केले.

यावेळी बालाजी माली पाटील, भास्कर पाटील शिंदे, आनंदराव कांबळे व कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी व गावकरी नागरिक यांची उपस्थिती होती तर प्रारंभी सदर संस्थेचे अध्यक्ष श्रीपत पाटील शिंदे यांनी प्रस्तावनेतुन आपली भूमिका स्पष्ट केली तर आभार जीवन पा. चव्हाण यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.