धुप्पा येथील समानता शेतकरी महिला बचतगटाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान.

227

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धान्य महोत्सव २०२२ विकेल ते पिकेल या अभियान अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळावा मध्ये धुप्पा ता.नायगाव येथील समानता महिला शेतकरी बचत गट गृहउद्योगाच्या माध्यमातून स्फुरतपणे सहभाग नोंदविल्याबद्दल समानता बचतगटाला मा.जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

धुप्पा ता.नायगाव येथील समानता शेतकरी महिला बचतगटांने इतरत्र कुठेही कर्ज न घेता विस महिलांनी दरमहीना शंभर शंभर रुपये जमा करून जवळपास दोन लाखांच्या उडीद पापड, पिठाची गिरणी व मिनी दालमिल खर्दी करुन गृह उद्योग सुरू केला असून कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धान्य महोत्सव २०२२ विकेल ते पिकेल या अभियान अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळावा मध्ये सहभागी होऊन उडिद मसाला पापड,बेसन पीठ,तुर, उडीद, मूग व हरभरा डाळीचे स्टाॅल लावुन दर्जेदार आणि योग्य भावात विक्री करण्यात आले असून समानता शेतकरी महिला बचतगटाने स्फुरत सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, नायगाव कृषी अधिकारी गोसावी यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमाणपत्र स्वीकारताना समानता शेतकरी महिला बचत गटांच्या अध्यक्षा मिनाबाई गणेश पाटील,नई दिषा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष गंगाधर पाटील धुप्पेकर, सीईओ पंचफुला वडे, सदस्या सुरेखा टेकाळे सह आदींची उपस्थिती होती.
कृषी विभाग,आत्मा व नई दिषा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष गंगाधर पाटील धुप्पेकर, सीईओ पंचफुला मारोती वडे यांचे समानता शेतकरी महिला बचतगटाला विशेष सहकार्य मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.